• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

32 सेकंदांत चाकूने 34 वार ! पती बनून शाळेत गेला अन् ..रक्तरंजित हत्याकांडाने हादरलं शहर

August 4, 2026 by admin Leave a Comment


हरियाणातील फरीदाबाद येथे खासगी शाळेतील शिक्षिका संध्या यांची 27 वेळा चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. फरीदाबादमधील सिक्रोना गावात सोमवारी सकाळी, तोंडाला मुखवटा लावलेल्या एका माथेफुरू तरुणाने एका खाजगी शाळेत घुसून एका शिक्षिकेची निर्घृणपणे भोसकून हत्या केली. आरोपीने अवघ्या 32 सेकंदांत त्या शिक्षिकेवर 34 वेळा सपासप वार केले. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. संध्या असं मृत शिक्षिकेचं नाव असून याप्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी अमित आणि संध्या यांची ओळख सुमारे वर्षभरापासून असल्याचे उघड प्राथमिक चौकशीत झालं आहे. आरोपी यापूर्वीही त्यांचा सातत्याने छळ करत होता. प्रकरण इतके वाढले होते की गावात दोन वेळा पंचायत बोलावण्यात आली होती आणि आरोपीने सर्वांसमोर माफीही मागितली होती. मात्र, त्यानंतरही त्याने त्रास सुरूच ठेवला आणि अखेर शाळेच्या आवारात घुसून हे भीषण कृत्य केलं.

पोलिसांनी केलेला तपास आणि शाळा व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संध्या या वर्षभरापूर्वी जवळच्या कोट गावातील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ही शाळा भाड्याच्या इमारतीत चालवली जात होती. ज्या व्यक्तीच्या इमारतीत शाळा होती, आरोपी अमित हा त्याचा पुतण्या असल्याचे सांगितले जात आहे. याच काळात अमित आणि संध्या यांची ओळख झाली. सुरुवातीला सामान्य ओळख झाली तरी काही दिवसांनी अमितने संध्या यांचा पाठलाग करणं आणि त्यांना त्रास देणं सुरू केले. सततच्या या छळाला कंटाळून संध्या यांनी ही बाब आपल्या माहेरच्या आणि सासरच्या कुटुंबीयांना सांगितली.

दोन वेळा बोलावली पंचायत; आरोपीने मागितली होती माफी

हे प्रकरण गंभीर होताच गावात पंचायत बोलावण्यात आली. त्यावेळी आरोपी अमितने सार्वजनिकरित्या आपली चूक मान्य करत माफी मागितली. त्यानंतर काही काळ प्रकरण शांत झाले. मात्र, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संध्या यांनी खबरदारी म्हणून कोट गावातील शाळा सोडून सिकरौना येथील दुसऱ्या शाळेत नोकरी स्वीकारली. या संपूर्ण वादावरून गावात दोन वेळा पंचायत झाली होती. प्रत्येक वेळी आरोपीने माफी मागितली, पण त्याच्या वागण्यात कायमस्वरूपी बदल झाला नाही.

नव्या नोकरीतही पाठलाग कायम

शाळेचे संचालक तेजपाल शर्मा यांनी सांगितले की, संध्या गेल्या वर्षभरापासून सिकरौना येथील त्यांच्या शाळेत अध्यापन करत होत्या. त्या अत्यंत शांत, संयमी स्वभावाच्या होत्या. त्या नेहमी डोक्यावर ओढणी घेत असत आणि त्यांचं संपूर्ण लक्ष शिकवण्यावरच असायचं. शाळेत त्या कोणाशीही उगाच बोपलायच्या नाही, अघळपघळ वागणं नसायचं. मात्र या जुन्या वादाचे रुपांतर इतक्या भीषण घटनेत होईल, याचा कोणी स्वप्नातही विचारा केला नव्हता.

पती असल्याचे सांगून शाळेत पोहोचला आरोपी

तपासात असेही समोर आले आहे की, संध्या यांचे पती अधूनमधून शाळेत येत असत. कधी डबा देण्यासाठी, कधी घराची चावी आणण्यासाठी किंवा इतर काही आवश्यक कामासाठी त्यांचे शाळेत येणे नेहमीचं होतं. आरोपी अमितने याच गोष्टीचा फायदा घेतला. घटनेच्या दिवशी शाळेजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने धुळीपासून बचावासाठी अनेकांनी चेहरा कापडाने झाकला होता. आरोपीनेही चेहरा झाकून शाळेत प्रवेश केला आणि आपण संध्या यांचे पती ‘विक्की’ असल्याचं त्याने सांगितलं. संध्या यांचे पती यापूर्वीही शाळेत आले होते, त्यामुळे शाळेच्या कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला नाही. त्यांनी संध्या यांना बाहेर बोलावले.

बाहेर येताच केला हल्ला

मात्र ज्या क्षणी संध्या शाळेबाहेर आल्याच, त्याचवेळी आरोपीने त्यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी सातत्याने हल्ला करत असल्याचे कॅप्चर झालं आहे. त्यावेळी संध्या जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत होत्या. त्यांचा आवाज ऐकून एक व्यक्ती मदतीसाठी पुढे आला, मात्र आरोपीने त्यालाही चाकूचा धाक दाखवत मागे हटवलं. त्यानंतर संध्या यांचा जागीच मृत्यू होईपर्यंत आरोपी त्यांच्यावर वार करत राहिला.

तब्बल 27 वेळा चाकूचे वार

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने संध्या यांच्यावर अवघ्या काही सेकंदातं तब्बल 27 वेळा चाकूने वार केले. हल्ल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या हत्येच्या भीषणतेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अमितला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपीने ही हत्या पूर्वनियोजित होती का, त्याने शाळेची रेकी केली होती का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेनंतर खासगी शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, शाळेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख चेक करण्यात आली असती, तर ही घटना टाळता आली असती. संध्या यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबासह शाळेतही शोककळा पसरली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक या घटनेमुळे प्रचंड धक्क्यात आहेत. फरीदाबाद पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपीची चौकशी करण्याबरोबरच त्याचा मोबाईल, कॉल डिटेल्स आणि अलीकडील हालचालींचीही तपासणी केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पर्यटकांची पहिली पसंती! पश्चिम चंपारणच्या ‘या’ वन्यजीव स्थळाला रोज 1,000 सैलानींची भेट
  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या
  • मुंबई पालिका आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारली, वंचितचा आरोप; माफीची मागणी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in