• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

25 वर्षांनी लहान बोल्ड अभिनेत्रीसोबत जोडी; भडकला ‘आशिकी’ फेम राहुल रॉय, रागात आपटली गिटार

June 2, 2026 by admin Leave a Comment


‘आशिकी’ या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरील रील्समुळे चर्चेत आला होता. एका रील स्टारसोबत त्याने हे व्हिडीओ शूट केले होते आणि त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा भडीमार केला होता. त्यानंतर राहुल रॉयने सोशल मीडियावर पोस्ट लिहित काम देण्याची मागणी केली होती. आता राहुल रॉय ‘लाफ्टर शेफ 3’ या कुकिंग शोच्या आगामी एपिसोडमध्ये पाहुणा म्हणून झळकणार आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच पोस्ट करण्यात आला असून त्यामध्ये राहुल रॉयचं वागणं पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

या प्रोमोमध्ये राहुल रॉय त्याच्या खास अंदाजात एण्ट्री करतो. ‘आशिकी’मधील लोकप्रिय गाणं गात तो या शोमध्ये येतो. प्रेक्षक आणि इतर सेलिब्रिटीसुद्धा टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत करतात. मात्र त्यानंतर सेटवरील वातावरण अचानक बदलतं. सूत्रसंचालक भारती सिंह जेव्हा राहुलला सांगते की शोमध्ये त्याची जोडीदार अभिनेत्री निया शर्मा असेल आणि तिच्यासोबत त्याला एखादा पदार्थ बनवावा लागेल, तेव्हा त्याचा पारा चढतो. राहुलला त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या निया शर्मासोबतची जोडी पटत नाही. तो रागाच्या भरात जमिनीवर गिटार आदळतो आणि म्हणतो, “मी हा शो करणार नाही.” राहुलला इतक्या रागात बघून सेटवरील प्रत्येकजण चकीत होतो.

यावेळी निया शर्मा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, “राहुलजी, तुम्ही माझ्याबद्दल जसा विचार करत आहात, तशी मी नाही. तुम्हाला माझ्याबद्दल चुकीचं सांगण्यात आलं आहे. मी तशी अजिबातच नाही.” तरी राहुलचा राग काही केल्या कमी होत नाही. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बिचारी निया.. राहुल इतका कसा काय बदलला’, असा सवाल एकाने केला. तर ‘कदाचित हा पब्लिसिटी स्टंट असावा’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

राहुल रॉयची पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy)

‘आशिकी’ या चित्रपटानंतर राहुलचा स्टारडम तुफान वाढला होता. सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा होती आणि त्याला अनेक चित्रपटांचे ऑफर्स मिळू लागले होते. परंतु ‘आशिकी’सारखी जादू त्याला पुन्हा पडद्यावर दाखवता आली नाही. हळूहळू तो प्रकाशझोतापासून दूर गेला आणि चित्रपटांमध्ये कमी झळकू लागला. काही दिवसांपूर्वी रीलमध्ये पुन्हा चर्चेत आल्यानंतर राहुलने त्याची परिस्थिती सांगितली होती.

‘मला काही कायदेशीर प्रकरणांमध्ये पैसे द्यायचे आहेत आणि ही प्रकरणं आजची नाहीत. ही त्यावेळची आहेत, जेव्हा मला ब्रेक स्ट्रोक आला नव्हता. जर तुम्ही माझ्या साधेपणाची किंवा माझ्या समस्यांची खिल्ली उडवत असाल, ट्रोल करत असाल तर हे माझ्याबद्दल कमी आणि तुमच्याबद्दल अधिक सांगतं. जर तुम्हाला खरंच इतकी चिंता असेल तर मला एखादं चांगलं आणि योग्य काम मिळवण्यात मदत करा, जेणेकरून मी माझ्या खटल्यांचे पैसे देऊ शकेन. कमीत कमी मी मेहनत करून पैसे कमावतोय, दुसऱ्यांची खिल्ली उडवून नाही,’ अशा शब्दांत राहुलने ट्रोलर्सना सुनावलं होतं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, या आमदाराचाही आज पक्षप्रवेश होणार?
  • US-Iran डील सुरु असतानाच सोने आणि चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, नवे दर काय ?
  • Revati Sule Wedding Photo: रेवती सुळेच्या सासुबाईंना पाहिलंत का? पिंक साडीने वेधले सर्वांचे लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in