• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

24 कॅरेटपेक्षा 22 कॅरेट सोनं किती स्वस्त असतं? काय फरक असतो आणि किती पैसे वाचतात? जाणून घ्या

August 3, 2026 by admin Leave a Comment


सोनं हा पृथ्वीतलावरील सर्वात महागडा धातू आहे. कारम सहज मिळत नाही आणि अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. खाणीतून एक टन माती उरकल्यानंतर अवघं काही ग्रॅम सोनं मिळतं यावरून सोन्याचं महत्त्व कळतं. कारण ते मिळवण्यासाठी खर्च काही कमी नाही. त्यामुळे सोन्याचा पुरवठा कमी आणि मागणी अधिक आहे. इतकंच काय तर सोन सुरक्षित गुंतवणूकही मानली जाते. जेव्हा आर्थिक मंदी, युद्धजन्य स्थिती आणि चलनाचे मूल्य घसरते तेव्हा लोकं सोन्यात गुंतवणूक करतात. भारतात तर लग्नकार्यात आणि सणासुदीला सोन्याची खरेदी करणं एक सांस्कृतिक परंपरा आहे. फक्त दागिनेच नाही, तर सोन्याचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, अंतराळ मोहीम आणि वैद्यकीय क्षेत्रातही होतो. पण तुम्ही कधी सोनं खरेदी करण्यासाठी गेला असाल तेव्हा 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याबाबत जाणून घेतलं असेलच.. या दोन्ही सोन्याच्या किमतीत फरक आहे.

22 कॅरेट सोनं स्वस्त का असते?

सरफा बाजारात सोन्याच्या किमतीत दररोज चढउतार होत असतो. सोमवारच्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 44 हजार 210 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 32 हजार 190 प्रति 10 ग्रॅम आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की 24 कॅरेटच्या तुलनेत 22 कॅरेट सोनं जवळपास 8.4 टक्के स्वस्त आहे. जर तुम्ही आजच्या भावानुसार सोनं खरेदी करायला गेलात तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोनं तुम्हाला 12,020 रुपयांनी स्वस्त पडेल. इतका फरक सर्वसामान्या नागरिकांना लग्नसोहळ्यात खूपच महत्त्वाचा ठरतो. 22 कॅरेट सोनं स्वस्त असण्याचं कारण म्हणजे शुद्धता…

24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्ं किती शुद्ध असतं?

22 कॅरेट सोनं पूर्ण म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध असते. यात इतर कोणत्याही धातूचं मिश्रण केलं जात नाही.तर 22 कॅरेट सोनं हे 91.6 टक्के शुद्ध असतं, तर 8.4 टक्के भाग हा तांबं किंवा चांदी असते. पण 24 कॅरेट सोनं हे खूपच नरम असतं त्यामुळे त्यातून दागिने घडवणं काही होत नाही. त्यामुळे दागिन्यांना मजबुती येण्यासाठी त्यात इतर धातू मिसळावे लागतात. त्यातून 22 कॅरेट सोनं तयार होतं. 22 कॅरेट सोनं हे टणक असतं. 22 कॅरेट सोनं 24 कॅरेटच्या तुलनेत स्वस्त असतं. पण दागिने बनविताना त्यासाठी येणारा खर्च आणि 3 टक्के जीएसटी वेगळा असतो. त्यामुळे बिलाच्या रकमेत वाढ होते. पण तुमचा हेतू फक्त गुंतवणूक करणं असले तर 24 कॅरेट सोनं हा उत्तम पर्याय मानला जातो. यावर काही मेकिंग चार्ज वगैरे नसतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल
  • Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in