
राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे भेसळयुक्तांविरोधात मोठी कारवाई करत आहेत. ज्यामुळे भेसळयुक्तांचे धाबे दणाणली आहेत. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्येही घाण, सडलेले अन्न आढळून आले. पनीर, दूध आणि दह्यामध्येही मोठी भेसळ होते, हे तुकाराम मुंडेंच्या कारवाईतून स्पष्ट झाले. त्यातच आता एका पंचतारांकित हॉटेलमधील धक्कादायक वास्तव्य पुढे आले. या छापेमारी वेळी हॉटेलमधून खराब झालेल्या 207 किलो भाज्या, 32 लीटर दूध आणि इतर 250 किलो पदार्थ आढळून आली. यादरम्यान पथकाला स्पष्ट आढळून आले की, काही भाज्यांना बुरशी देखील लागली. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांच्या पथकालाही धक्का बसला. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इतके घाण अन्न कसे असू शकते, याने अधिकारीही चक्रावले.
स्वयंपाक घर म्हणजे तर घाणीचे साम्राज्य होते. अन्नसुरक्षा मानकांनुसार, लेबलिंग चुकीची आढळून आली. बंगळुरूमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाला कारवाईत हा धक्कादायक प्रकार आढळून आला. अन्नसुरक्षा आयुक्तांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्र्यांच्या देखरेखीखाली अधिकाऱ्यांचे 30 पथके तयार करण्यात आली. बंगळुरूमधील 26 थ्री स्टार आणि पंचतारांकित हॉटेलची तपासणी करण्यात आली.
चुकीचे नावे असलेली उत्पादने, मुदतबाह्य खाद्यपदार्थांचे साठवण, बुरशी आलेल्या भाज्या, शाकाहारी आणि मांसाहारी अन्न पदार्थ एकत्रच. पदार्थांची साठवणूक अनेक दिवसांपासून आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने. हेच नाही तर प्रशासनाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी विविध नमुनेही पाठवली. ज्यात हळद पावडर, मासांहारी पदार्थ, खाद्यतेल, चहा पावडर, टोमॅटो सॉस, लिंबाचा रस, काजू, पापड, मसाला पावडर, काळी मिरी यांचा समावेश आहे.
200 किलो भाज्या तयार करून ठेवण्यात आल्या, ज्याला बुरशी लागल्याचेही पथकाला कारवाई दरम्यान दिसून आले. महाराष्ट्रानंतर आता बंगळुरूमध्येही मोठी कारवाई भेसळयुक्तांविरोधात केली जातंय. तुकाराम मुंडे यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, पुढील टार्गेट दारू भेसळयुक्तांकडे आहे. दारूच्या तक्रारी आमच्याकडे बऱ्याच येत आहेत . लोक बारमध्ये बसून फोन करतात. तुकाराम मुंडे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाईचे काैतुक केले जातंय.
Leave a Reply