भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ‘आएगा आनेवाला’ हे गाणे आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. 1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'महल' या चित्रपटातील हे गाणं केवळ सुपरहिट ठरले नाही तर याच गाण्यामुळे लता मंगेशकर यांना देशभरात मोठी ओळख मिळाली. हे गाणे अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल […]
Archives for June 2026
दिल्ली उच्च न्यायालयाचा टेलिग्रामबाबत मोठा निर्णय; झटका कुणाला? सरकार की…?
दिल्ली उच्च न्यायालयाकडून टेलिग्राम ॲपला मोठा झटका बसलेला पाहायला मिळाला आहे. बंदीविरोधातील त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. न्यायालयाने 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या आदेशाला कायम ठेवले. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने योग्य तो विचार करुनच हा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, केंद्र […]
योग तुमचा विचार आणि जीवन बदलेल, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘या’ सोप्या शब्दांत द्या भाषण
दरवर्षी प्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जाईल. हा योगा दिवस केवळ आपल्या शारीरिक आरोग्याचे नव्हे, तर आपल्या विचारांमध्ये आणि जीवनशैलीतही परिवर्तन घडवून आणण्यावर प्रकाश टाकतो. प्राचीन भारतीय ज्ञानावर आधारित असलेला योग आता एक जागतिक चळवळ बनला आहे. योग आपल्या जीवनात संतुलन, शांती आणि सकारात्मकता आणतो. तसेच मनाला शांत […]
सीएनजी की फ्लेक्स-फ्यूल? नक्की कोणत्या कारमध्ये मिळणार जास्त मायलेज आणि कोणती गाडी असेल खिशाला परवडणारी?
कमी खर्चात जास्त प्रवास करण्यासाठी सीएनजी की फ्लेक्स-फ्यूल कार फायदेशीर ठरेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. सीएनजीमुळे गाडी चालवण्याचा रोजचा खर्च खूप कमी होतो. दुसरीकडे, फ्लेक्स-फ्यूल गाड्या स्वस्त अशा इथेनॉलवर चालत असल्यामुळे पर्यावरणपूरक आहेत. या दोन्हीपैकी तुमच्या बजेटसाठी कोणती गाडी सर्वोत्तम ठरेल, याचे सोपे विश्लेषण येथे दिले आहे. भारतातील कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी आम्ही अशा […]
AUS vs BAN: ऑस्ट्रेलियाने वनडेची भरपाई टी20 मालिकेत केली, तिसऱ्या सामना होण्यापूर्वीच सीरिज खिशात
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशला 7 धावांनी पराभूत केलं आणि मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 षटकात 6 गडी गमवून 189 धावा करू शकला. […]
SLA vs AFGA : श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 103 धावांनी धुव्वा
यजमान श्रीलंका टीमने ट्राय नॅशन ए सीरिजच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. श्रीलंकने या स्पर्धेत आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान ए संघावर एकतर्फी विजय मिळवला. श्रीलंकेने अफगाणिस्तानसमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानला संपूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. श्रीलंकेने अफगाणिस्तानला 42.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. श्रीलंकेने अशाप्रकारे 103 धावांनी धुव्वा उडवला. […]