• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2014 मधील ऐश्वर्याच्या कान्स लूक पाहून भारावून गेलेला अभिषेक, म्हणालेला माझे डोळे पूर्णपणे उघडले

May 24, 2026 by admin Leave a Comment


Aishwarya Rai : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील आपल्या ग्लॅमरस उपस्थितीमुळे चर्चेत आली आहे. 79 व्या Cannes Film Festival मध्ये ऐश्वर्याने अधिकृत सहभाग नोंदवला असून तिच्या दोन वेगवेगळ्या लुक्सनी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

याचदरम्यान तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ एक्स (पूर्वी ट्विटर) वर व्हायरल होत आहे. ही पोस्ट 2014 मधील 67 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यानचा आहे. त्या वेळी ऐश्वर्या रेड कार्पेटवर अत्यंत आकर्षक अंदाजात दिसली होती आणि तिचा तो लुक पाहून अभिषेक अक्षरशः भारावून गेला होता.

अभिषेकने त्या वेळी ऐश्वर्याचा फोटो शेअर करत लिहिले होते, गेल्या जवळपास 52 तासांपासून झोपलो नव्हतो. डोळे मिटत होते आणि अचानक माझी पत्नी अशा अंदाजात समोर आली. आता मात्र डोळे पूर्ण उघडे झाले आहेत. त्याच्या या रोमँटिक आणि कौतुकपूर्ण पोस्टची आता पुन्हा जोरदार चर्चा होत आहे.

2014 मधील लुकची होतेय प्रचंड चर्चा

2014 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने डिझायनर रॉबर्टो कॅव्हल्ली यांच्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री केली होती. फिशटेल स्टाइलमधील हा गाऊन तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत होता. विशेष म्हणजे, यंदाच्या 79 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिचा पहिल्या दिवसाचा लुक काहीसा त्याच धाटणीचा असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

ऐश्वर्याच्या कान्स प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2002 मध्ये Devdas या चित्रपटामुळे कान्समध्ये पदार्पण केले होते. त्या वेळी तिच्यासोबत शाहरुख खानआणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी उपस्थित होते. त्या क्षणापासून ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवरील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या भारतीय अभिनेत्रींपैकी एक बनली.

Almost 52hrs without sleep! Eyes shutting… and the Mrs. Shows up looking like this!! Ok.. Eyes wide open now! pic.twitter.com/r8zIUTsBV0

— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) May 21, 2014

घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आणि बॉलिवूड वर्तुळात सुरू आहेत. जुलै 2024 मध्ये एका हाय-प्रोफाइल लग्नसमारंभात दोघे वेगवेगळे पोहोचल्यामुळे या चर्चांना सुरुवात झाली होती.

मात्र, मागील वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या मांगात सिंदूर लावून दिसली होती, ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे अनेकांचे मत होते. त्यानंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
  • Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in