• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

20 जीबीपर्यंत Free Data, जिओच्या ‘या’ 4 प्लॅन्समध्ये मिळतोय अतिरिक्त डेटाचे फायदे

July 11, 2026 by admin Leave a Comment


तुम्ही जर रिलायन्स जिओ सिम वापरत असाल तर पुढच्या वेळी रिचार्ज करण्यापूर्वी कोणत्या प्रीपेड प्लॅन्समध्ये 20GB पर्यंत मोफत डेटा मिळतो याची माहिती जाणून घ्या. कारण जिओ कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी असे काही प्लॅन्स लाँच केलेले आहेत ज्यात किमान 5GB आणि कमाल 20GB अतिरिक्त डेटा मिळतो. चला तर मग आजच्या लेखात जिओ असे कोणते प्लॅन आहेत त्यासोबतच त्यांच्या किमती किती आहेत, त्यासोबत मिळणारे अतिरिक्त फायदे हे सर्व आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

जिओचा 459 रूपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा, तसेच अतिरिक्त 5 जीबी डेटा, कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. याव्यतिरिक्त तुम्हाला 35 हजार 100 रूपये किमतीचा गूगल जेमिनी प्रोचा ॲक्सेस, 5000 जीबी क्लाउड स्टोरेज आणि जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनचाही लाभ मिळेल. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची असून त्याचा दैनंदिन खर्च अंदाजे 16.39 रूपये आहे.

जिओचा 495 रूपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि 5 जीबी अतिरिक्त डेटा, तसेच कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. या 28-दिवसांच्या प्लॅनमध्ये जिओगेम्स क्लाउड आणि फॅनकोडचे 28-दिवसांचे सबस्क्रिप्शन, 500 हून अधिक प्रीमियम गेम्सचा ॲक्सेस आणि 35 हजार 100 रूपये किमतीच्या गूगल जेमिनी प्रोचा ॲक्सेस देखील मिळतो. या प्लॅनचा दैनंदिन खर्च अंदाजे 17.68 रूपये आहे.

जिओचा 749 रूपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा, तसेच 20 जीबी अतिरिक्त डेटा, कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. 72 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल ॲक्सेस, 50 जीबी मोफत स्टोरेज आणि गूगल जेमिनी प्रो ॲक्सेस मिळतो. या प्लॅनचा दैनंदिन खर्च अंदाजे 10.40 रूपये आहे.

जिओचा 899 रूपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 20 जीबी अतिरिक्त डेटा, तसेच दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या 90-दिवसांच्या प्लॅनसोबत 50 जीबी जिओ क्लाउड स्टोरेज, तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल आणि गूगल जेमिनी प्रोचा मोफत ॲक्सेस मिळतो. या प्लॅनचा दैनंदिन खर्च अंदाजे 9.99 रूपये आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke: मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष
  • नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर
  • नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
  • मोहन भागवत अमेरिकेत जाण्यापूर्वीच राऊत यांचा काय सल्ला? नेमकं काय म्हणाले?
  • ‘काही निहायती गवार लोक…’ मराठी भाषेच्या वादावरुन मनसेवर भडकली अभिनेत्री

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in