• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 रुपये की 4 रुपये? आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कितीने वाढ? जाणून घ्या दर..

May 26, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. 10 दिवसांमध्ये चाैथ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली. एका मागून एक दणके सर्वसामान्य लोकांना बसत आहेत. महागाईने मोठा कहर केला. पगारी वाढत नसून फक्त महागाई वाढत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. अचानक सर्व गोष्टींच्या किमती वाढल्याने घर नक्की कसे चालवायचे हा प्रश्न अनेकांच्या पुढे आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये चार पटीने वाढ झाली. महागाई आज किंवा उद्या कमी होईल, अशी आशा सर्वसामान्य लोकांना आहे. मात्र, इराण आणि अमेरिका युद्ध जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत तरी हे शक्य दिसत नाही. आज सीएनजीच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली. थेट दणका पुन्हा एकदा लोकांना बसलाय. आज 26 मे2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती वाढ किंवा घट झाली आहे, याबाबत चला जाणून घेऊयात. कालच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली.

आज मुंबईमध्ये 111.21.पेट्रोल तर डिझेल 95.20 प्रति लीटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 102.12 तर डिझेल 95.20 रूपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 113.51 तर डिझेल 99.82 प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये 107 पेट्रोल तर डिझेल 99.66 आहे. पटना येथे पेट्रोल 113.35 तर डिझेल 99.36 प्रति लीटर आहे. गाझियाबाद येथे पेट्रोल 101.80 आहे तर डिझेल 94.90 आहे. हैद्राबाद येथे पेट्रोल 115.69 तर डिझेल 103.82 आहे. बेंगलुरू येथे पेट्रोल 102 तर डिझेल 90.99 रूपये प्रति लीटर आहे.

चार वर्षानंतर मे महिन्याच्या 15 मे 2026 रोजी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या 3 रूपयांनी वाढले. त्यानंतर पुन्हा 19 मे 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 90 पैशांनी वाढ करण्यात आली. 23 मे 2026 रोजी तिसऱ्यांदात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ 87 पैशांनी झाली. काल 25 मे 2026 रोजी पेट्रोलच्या किमतीमध्ये 2.61 रूपये प्रति लीटर तर डिझेलच्या किमतीमध्ये 2.71 रूपयांनी वाढ झाली.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कालच्या वाढीनंतर स्थिर आहेत. मात्र, इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस असेच चालले तर पेट्रोल आणि डिझेलच्या आणि इतर काही गोष्टींच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. होर्मुज खाडी बंद असल्याने पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा बघायला मिळत आहे. त्यामध्येच सरकारकडून निर्णय घेत किमतीमध्येही मोठी वाढ केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हॉटेलमध्ये तीन तरुणींसोबत काँग्रेसचा नेता पकडला, अय्याशी करतानाच…
  • पुढील 72 तास धोक्याचे… राज्याच्या या भागाला पावसाचा अलर्ट; विदर्भ, मराठवाडा…
  • उदयपूर मान्सून ट्रॅव्हल: हिरवेगार डोंगर आणि ढगांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी 5 खास ठिकाणे
  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in