• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ही अभिनेत्री, अचानक झाले वेगळे ? ब्रेकअपचं कारण ..

June 20, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडसह साऊथच्या अनेक चित्रपटात काम केलेली, फक्त सौंदर्यवती म्हणूनच नव्हे तर अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिचे लाखो चाहते आहेत. सध्या मृणाल पुन्हा चर्चेत आहे, पण कामामुळे नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे. मृणाल ठाकूर आणि अभिनेता धनुष यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील कथित प्रेमाची चर्चा रंगली होती. फेब्रुवारीमध्ये ते विवाहबंधनात अडकणार असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या, मात्र तसं काहीच घडले नाही. मात्र आता याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, मृणाल आणि धनुष यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. त्यांच्या ब्रेकअपतच्या वृत्तामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र त्यांचे मार्ग वेगळे का झाले, असाच प्रस्शन सध्या अनेकांच्या मनात आहे.

मृणाल-धनुषचं का झालं ब्रेकअप ?

मृणाल ठाकूर आणि धनुष यांच्यातील कथित दुराव्याची चर्चा सध्या रंगली आहे. सूत्रांच्या हवाल्याने ‘फिल्मफेअर’ने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र, या ब्रेकअपमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. धनुष आणि मृणाल यांच्यातील नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. मात्र या दोघांनीही या चर्चांवर कधीही जाहीरपणे भाष्य केले नसले तरीही विविध कार्यक्रमांमधील त्यांचं एकत्र वावरणं आणि एकमेकांशी होणारा संवाद यामुळे चाहत्यांचे आणि सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधलं गेलं होतं.

‘सन ऑफ सरदार २’ (Son of Sardaar 2) या चित्रपटाच्या प्रीमियरला धनुषे हजेरी लावली होती, या चित्रपटात मृणाल ठाकूरने महत्त्वाची भूमिका साकारली होती. धनुषच्या हजेरीनंतर त्यांच्या दोघांमधी कथित प्रेमसंबंधांच्या चर्चांना अधिकच जोर चढला. अनेकांनी त्याच्या या उपस्थितीकडे पाठिंबा दर्शवणारी कृती म्हणून पाहिलं, ज्यामुळे त्यांच्यातील डेटिंगच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. सततच्या चर्चा असूनही, या दोन्ही कलाकारांनी आपले वैयक्तिक आयुष्य खाजगीच ठेवले; धनुष किंवा मृणाल यांपैकी कोणीही त्यांच्यातील संबंधांना कधीही अधिकृत दुजोरा दिला नाही.

अभिनेता धनुषने आपलं वैयक्तिक आयुष्यं नेहमीच खासगी ठेवलं. लग्नानंतर 18 वर्षांनी, 2022 साली त्याने आपली पत्नी ऐश्वर्या रजनीकांत हिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. वेगळे झाल्यानंतर त्याने किंवा ऐश्वर्याने त्यांच्या नात्याबद्दल कधीही भाष्य केले नाही; आपल्या खाजगी आयुष्याची सार्वजनिक चर्चा होऊ देण्याऐवजी धनुषने नेहमीच आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं

दुसरीकडे, मृणाल ठाकूरने ‘सीता रामम’, ‘हाय नन्ना’ आणि ‘द फॅमिली स्टार’ यांसारख्या चित्रपटांच्या काम केलं, तिचे लाखो चाहते आहेत. या वर्षी ती ‘दो दिवाने शहर में’, ‘डकैत: अ लव्ह स्टोरी’ आणि ‘है जवानी तो इश्क होना है’ या तीन चित्रपटांमध्ये झळकली. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘पूजा मेरी जान’ आणि ‘राका’ यांचा समावेश आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in