• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब

July 30, 2026 by admin Leave a Comment


प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात पदार्थांची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. तर लसूण अन्नाची चव आणि सुगंध वाढवतोच शिवाय आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. डाळ, भाज्या, चटण्या आणि इतर अनेक पदार्थांमध्ये लसूण वापरल्याने त्यांची चव वाढते. त्यात ॲलिसिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात, जी शरीरासाठी आवश्यक मानली जातात. त्यामुळे अनेकजण आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करतात.

पदार्थांमध्ये लसूण वापरण्याआधी तो सोलणे हे अनेकांसाठी एक अवघड आणि कंटाळवाणे काम वाटतं. त्याची पातळ, कोरडी साल बोटांनी सहज निघत नाही, ज्यामुळे हे काम वेळखाऊ ठरते. विशेषतः जेव्हा एकाच वेळी जास्त लसूण सोलायचा असतो, तेव्हा हे काम आणखीच त्रासदायक ठरते. त्यामुळे आपल्यापैकी बहुतेकजण लसूण झटपट कसा सोलून होईल यासाठी अनेक उपाय करतात. तर आजच्या लेखात आपण लसूण सोलण्याच्या काही सोप्या ‍ट्रिक्स आहेत ते जाणून घेऊयात.

काही मिनिटांत लसूण सोलायचे आहे, या सोप्या ट्रिक्सचा करा वापर

जर तुम्हाला लसूण सोलायला जास्त वेळ लागत असेल, तर काही सोप्या पद्धती आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही ते काही मिनिटांत करू शकता. सर्वात सोपा मार्ग म्हणजे लसणाच्या पाकळ्या एका भांड्यात ठेवून, त्यावर दुसरे भांडे किंवा प्लेट ठेवून काही सेकंदांसाठी जोरात हलवणे. यामुळे बऱ्याच पाकळ्यांची साल सैल होईल. याव्यतिरिक्त लसणाच्या पाकळ्या 5 ते 10 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवल्याने देखील सालं लवकर सोलता येतात.

तुम्ही सुरीच्या मदतीने लसणाची पाकळी सोलून घेऊ शकता. जर तुम्हाला एकाच वेळी जास्त लसूण सोलायचा असेल, तर मायक्रोवेव्हमध्ये 10 ते 15 सेकंदांसाठी हलके गरम केल्याने साल सैल होते आणि काही मिनिटांतच लसूण सोलून ठेवता येतो. मात्र लसूण जास्त वेळ गरम करणे टाळा, कारण यामुळे लसणाच्या पोतावर आणि चवीवर परिणाम होऊ शकतो.

लसूण सोलताना या गोष्टी लक्षात ठेवा

लसूण सोलताना नेहमी सुक्या आणि चांगल्या प्रतीच्या पाकळ्या निवडाव्यात, कारण खराब झालेला किंवा नरम लसूण लवकर खराब होऊ शकतो. पाणी वापरत असल्यास पाकळ्या जास्त वेळ पाण्यात भिजवू नका कारण त्यामुळे त्यांची चव आणि पोत बदलू शकतो.

सुरीने लसणाची साल काढताना हाताला इजा होऊ नये याची काळजी घ्या. गरजेनुसारच लसूण सोला, कारण सोललेला लसूण जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्याचा ताजेपणा आणि सुगंध कमी होऊ शकतो.

लसूण जास्त दिवस ताजा कसा ठेवावा?

लसूण जास्त दिवस ताजा ठेवण्यासाठी तो थंड, कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवा. हवाबंद प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यास त्यात ओलावा अडकून राहू शकतो, ज्यामुळे लसूण लवकर खराब होऊ शकतो.

लसूण जाळीच्या टोपलीत कागदी पिशवीत किंवा हवेशीर उघड्या भांड्यात साठवून ठेवणे उत्तम. लसूण सूर्यप्रकाश आणि जास्त आर्द्रतेपासून दूर ठेवा. जर लसणाच्या पाकळ्या आधीच सोललेल्या असतील, तर त्या रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा आणि काही दिवसांतच वापरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in