• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..

May 22, 2026 by admin Leave a Comment


भाजपा नेते आणि आमदार प्रसाद लाड मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता त्यांच्या घरी गेले. मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रसाद लाड यांनी टीका केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना चर्चेकरिता 23 मे 2026 पूर्वी माझ्याकडे या असे म्हटले होते. त्यानंतर आज प्रसाद लाड हे जरांगे यांच्या भेटीकरिता गेले. यादरम्यान ते छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी असताना त्यांना धमकी देण्यात आली. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीकरिता जाण्यापूर्वी म्हटले होते की, मी भाजपा आमदार किंवा नेता म्हणून नाही तर माझ्या भावाच्या आणि मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे चर्चेकरिता जात आहे. प्रसाद लाड यांना मिळालेल्या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. स्वत: भागवत कराड हे प्रसाद लाड यांच्यासोबत दिसले.

मनोज जरांगे यांच्यासोबत बोलताना प्रसाद लाड भावूक झाल्याचेही बघायला मिळाले. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना बोलताना म्हटले की, आम्ही ओबीसीचे आरक्षण मागत नाहीत तर आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत. आमचे लेकरं आज दुसऱ्यांच्या शेतात काम करतात, ऊसतोडी करतात, स्वत: जे वावर असूनही.

त्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण दिलं जातं. ओबीसीचे नाही तर आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. तुम्हाला काय वाटतंय तेच आम्हाला कळत नाही. ओबीसी आरक्षणाला नेमका निकष काय लावला? आम्हाला तीन वेळा मागास सिद्ध केले तरीही आरक्षण मिळत नाही. 1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण दिले?

आमचे गॅझेट आहे तर आम्हाला आरक्षण द्या. मराठा समाजाला सरसगट प्रमाणतपत्रे का दिली जात नाहीत? 4 वर्षात ओबीसींची संख्या 30 टक्के वाढली कशी, असाही मोठा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांच्या या बोलण्याने पुन्हा एकदा मराठा विरूद्ध ओबीसी असा मुद्दा उपस्थित राहत आहे. यादरम्यान त्यांनी म्हटले की, मंडळाने कोणता सर्व्हे केला दाखवा, असेही त्यांनी म्हटले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in