• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1972 मधील प्रचंड बोल्ड सीन, ज्यामुळे निर्माण झालेला वाद, भारतात चित्रपटावर होती बंदी, पण आता..

August 6, 2026 by admin Leave a Comment


सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत बोल्ड सीन प्रेक्षकांसाठी फारशी नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र, सुमारे पाच दशकांपूर्वी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात साधे किसिंग सीनही मोठ्या धाडसाचे मानले जात होते. अशा वातावरणात 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने आपल्या धाडसी सीनमुळे देशभरात प्रचंड खळबळ उडवली होती. या चित्रपटात अभिनेत्रीच्या न्यूड सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला आणि त्यावर भारतात बंदीही घालण्यात आली होती. या चित्रपटात कपूर घराण्यातील देखणे अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री सिमी गरेवाल मुख्य भूमिकेत झळकले होते.

या चित्रपटाचे नाव ‘सिद्धार्थ’ होते. 1972 मध्ये प्रदर्शित झालेला हा इंडो-अमेरिकन ड्रामा आणि मिस्ट्री चित्रपट होता. नोबेल पुरस्कार विजेते जर्मन लेखक हर्मन हेसे यांच्या 1922 मध्ये प्रकाशित झालेल्या सिद्धार्थ या प्रसिद्ध कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता.

चित्रपटाचे दिग्दर्शन कॉनरॅड रुक्स यांनी केले होते. शशी कपूर आणि सिमी गरेवाल यांच्यासोबत इतर अनेक कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

सिमी गरेवाल यांनी सांगितला शूटिंगदरम्यानचा अनुभव

अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी लेखक असीम छाब्रा यांच्या ‘Shashi Kapoor: The Householder Star’ या पुस्तकात सिद्धार्थ चित्रपटाच्या चित्रीकरणातील एक आठवण सांगितली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील एका न्यूड सीनचे चित्रीकरण करण्यापूर्वी त्या अत्यंत घाबरलेल्या होत्या. अशा वेळी शशी कपूर यांनी त्यांना धीर देत आत्मविश्वास वाढवला. सिमी म्हणाल्या, त्या सीनच्या आधी मी खूपच घाबरले होते. मी किती अस्वस्थ होते, हे शब्दांत सांगता येणार नाही.

धाडसी सीनमुळे भारतात बंदी

सिमी गरेवाल यांनी पुढे सांगितले की, त्या सीनसाठी त्यांनी कमरेखाली बॉडी स्टॉकिंग परिधान केले होते, मात्र वरचा भाग टॉपलेस ठेवावा लागणार होता. त्यामुळे त्या अत्यंत घाबरलेल्या होत्या आणि वर पाहण्याचे देखील त्यांचे धाडस होत नव्हते. त्यावेळी शशी कपूर यांनी त्यांची मनःस्थिती ओळखली आणि त्यांना धीर देत सांगितले, ‘लाजू नकोस सिमी, तू खूप सुंदर दिसतेस.’

सिमी यांच्या मते, शशी कपूर यांच्या या शब्दांमुळे त्यांना मोठा आत्मविश्वास मिळाला आणि त्यांनी तो सीन अधिक सहजतेने पूर्ण केला. ‘सिद्धार्थ’ चित्रपटातील बोल्ड आणि न्यूड सीनमुळे त्या काळात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या चित्रपटावर भारतात बराच काळ बंदी घालण्यात आली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in