• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

150 महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या लिंगपिसाट खरातची भूमिका इम्रान हाश्मी साकारणार? दिग्दर्शकाने काय सांगितलं?

May 30, 2026 by admin Leave a Comment


नाशिकसह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारं प्रकरण म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याचे कारनामे. नाशिकमधील या तथाकथित कॅप्टनने अनेक महिलांना फसवमू त्यांचं लैंगिक शोषण केलं, त्यांच्यावर अत्याचार केले, त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केल्याचं उघड झालं, गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे हे प्रकार सुरू होते. या संपूर्ण घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ माजली. एवढंच नव्हे तर भोंदू अशोक खरातने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत अनेकांची फसवणूक केली, लाखो रुपये, परदेशवारी, गाड्या अशा अनेक गोष्टी लुटल्या, फुटक्या कवडीची किंमत असलेल्या अंगठ्या आणि अनेक गोष्टी,आलेल्या भाविकांना लाखो रुपयांना विकत त्यांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केली.

आपल्या कारनाम्यांनी राज्याला हादरवणारा भोंदू अशोक खरात सध्या तुरूंगाआड असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण ‘खरात फाईल्स’ म्हणूनही ओळखलं जातं. आत याच केसवर एक सिनेमा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स नावाने हा सिनेमा येणार असून त्यात अनेक कलाकार महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

इम्रान हाश्मी साकारणार भोंदू अशोक खरातची भूमिका ?

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स या नावेन येमाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन स्वरुप सावंत करणार आहेत. भोंदू खरातच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात अनेक कलाकार दिसणार असून कॅप्टन खरातची भूमिका कोण साकारणार, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र एपस्टिन फाईल चित्रपटामधील अशोक खरातच्या भूमिकेसाठी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मीच्या नावाचा विचार होत असल्याचे समजते.

दिग्दर्शक स्वरुप सावंत यांने अभिनेता इम्रान हाश्मीसाठी विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातचे कारनामे, या केसवर आधाारित चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समजते. यात अशोक खरातच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी झळकू शकतो. मात्र इम्रान याने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by MarathiStars (@marathistar)

दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका

तर मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री, दीपाली सय्यद ही देखील या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिपाली दिसणार असून, त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. या सिनेमातून भोंदूगिरीवर प्रहार करण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. या सिनेमात त्या भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर दीपाली सय्यद यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Farmer Loan Waiver: शेतकर्‍यांसाठी गुडन्यूज! खात्यात खटाखट पैसा, दुसरा हप्ता वितरीत, यादीत नाव कसं चेक करणार?
  • एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची ही अभिनेत्री, हृतिक, रणबीर, रणवीरसह केलं काम; ओळखलं का ?
  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in