• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

14 जुलैपासून तयार होणार गजकेसरी योग, ‘या’ राशींचे भाग्य उजळणार

July 11, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योग हा सर्वात प्रभावशाली आणि शुभ योगांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की जेव्हा चंद्र आणि गुरु हे ग्रह जेव्हा एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. हा योग ज्ञान, आदर, संपत्ती, यश आणि भाग्य वाढवतो असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार कर्क राशीत चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे 14 जुलै 2026 पासून गजकेसरी योग तयार होईल. चंद्र 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजून 52 मिनिटांपर्यंत कर्क राशीत राहील. या काळात अनेक राशींना शुभ फळे मिळण्याची शक्यता आहे. हा काळ विशेषतः मेष, कर्क, सिंह आणि धनु राशींसाठी फायदेशीर मानला जातो.

गजकेसरी योग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरू एकाच राशीत किंवा मध्यवर्ती स्थानी असतात, तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. हा योग व्यक्तीची बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिती मजबूत करतो असे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीवर या योगाचा प्रभाव असतो, त्यांना जीवनात चांगल्या संधी मिळण्याची अधिक शक्यता असते. आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की गजकेसरी योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

मेष रास

गजकेसरी योग मेष राशीसाठी कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये शुभ संकेत देऊ शकतो. घरातील वातावरण सुधारेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा घरासंबंधी एखादा मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल, तर वेळ अनुकूल असू शकते.

कर्क रास

कर्क राशीत तयार होत असलेल्या गजकेसरी शुभ योगामुळे या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना सर्वाधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळू शकेल. तुमच्या करिअरमध्ये नवीन जबबदाऱ्या येऊ शकतात आणि तुमचा सामाजिक आदर वाढू शकतो.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग मानसिक शांती आणि आर्थिक बळ आणू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पावर काम सुरू केले असेल, तर त्याचे सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे.

धनु रास

धनु राशीवर स्वतः गुरु ग्रहाचे अधिपती आहेत. गजकेसरी योग या राशीसाठी विशेषतः शुभ मानला जातो. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते.

इतर राशींवरही परिणाम होईल

गजकेसरी योगाचे परिणाम केवळ चार राशींपुरते मर्यादित नाहीत. इतर राशींमध्ये जन्मलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार सकारात्मक किंवा सामान्य परिणाम मिळू शकतात. तथापि शुभ परिणामांचे प्रमाण हे व्यक्तीची जन्मकुंडली, तिची स्थिती आणि इतर ग्रहांच्या स्थितीवरही अवलंबून असते.

ते इतके शुभ का मानले जाते?

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रह ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचा घटक मानला जातो, तर चंद्र मन, भावना आणि मानसिक शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे दोन शुभ ग्रह अनुकूल स्थितीत असतात, तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि भाग्य वाढते असे मानले जाते. म्हणूनच गजकेसरी योगाला जीवनात प्रगती आणि यश मिळवून देणाऱ्या सर्वात शुभ योगांपैकी एक मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in