• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

100 किमी ताशी वेगाने वारे, विनाशकारी चक्रीवादळ धडकणार, IMD चा थेट मोठा इशारा, मॉन्सूनही..

May 29, 2026 by admin Leave a Comment


मॉन्सून अजून पूर्णपणे भारतात सक्रिय झाला नाही, त्याच्या अगोदरच मोठा इशारा देण्यात आला. पुढील 24 ते 48 तास अत्यंत धोकादायक असणार आहेत. भारतीय हवामान विभाग अर्थाच आयएमडीने अत्यंत मोठा इशारा दिला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 ते 48 तास अत्यंत धोक्याची आहेत. रिपोर्टनुसार, दक्षिण आणि पश्चिम मॉन्सून उत्तरेकडे ताकदीने पुढे सरकत आहे. पुढच्या तीन दिवसात अरबी सागर, बंगालची खाडी आणि लक्षद्वीपमध्ये परिस्थिती अनुकूल आहे. भारतीय हवामान विभागाने यासोबतच उत्तर आणि पश्चिम भारतात भयंकर चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा रेड अलर्ट जारी केला. अलर्ट जारी करण्यासोबतच आजचा दिवस काही राज्यांकरिता धोकादायक आहे. निसर्ग थैमान घालणार आहे.

उत्तर प्रदेशात 70 ते 80 किली मीटर तासाच्या वेगाने चक्रीवादळ धडकू शकते. 30 मे रोजी पूर्ण उत्तर प्रदेशात 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे असेल. 31 मे 2026 रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चंदीगड, दिल्ली आणि हरियाणामध्ये 70 ते 80 किलोमीटर वेगाने तूफान येईल. अतिमुसळधार पावसासोबत जोरदार वारेही वाहिल.

पुढील काही तास अत्यंत धोक्याची आहेत. बिहारमध्येही मुसळधार पाऊस जोरदार वाऱ्यासह येईल. 60 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे असेल. उत्तराखंडमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. झारखंडमध्ये 31 मे रोजी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाना वाऱ्यासह जोरदार पाऊस असेल. मध्य प्रदेशमध्येही 50 ते 60 किलोमीटर वेगाने चक्रीवारे असेल. 31 मे 2026 रोजी छत्तीगडगमध्येही चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला.

जवळपास सर्वच राज्यांमध्ये पुढील 24 ते 48 तासाकरिता चक्रीवादळासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. देशावर भयंकर मोठे संकट येऊ शकते. अगोदरच उत्तर प्रदेशमध्ये पावसासह चक्रीवादळाने थैमान घातलेले असतानाच हा एक अत्यंत मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना अगोदरच अलर्ट जारी करण्यात आला. रात्री हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे, दोन दिवस याचा प्रभाव राहण्याचाही अंदाज आहे. देशापुढे मोठं संकट उभे आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in