• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

10 लाखाहून थेट 80 लाख पगार, घर बसल्या कमावतेय ही पोरगी; काय सांगावं तुम्हीही कमवाल!

June 15, 2026 by admin Leave a Comment


सध्या आर्थिक संकटाचे दिवस आहेत. अनेक कंपन्यांमधून लोकांना काढलं जात आहे. आर्थिक चणचण सुरू असल्याने कंपन्या नोकर कपात करत आहे. पण सोशल मीडियावर सध्या एका तरुणीची कहाणी व्हायरल झाली आहे. ही कहाणी ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. केवळ एका वर्षात आपली सॅलरी 10 लाखाहून 80 लाख केल्याचा दावा या महिलेने केला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कार्पोरेट कंपनीत काम न करता, कोणतंही टार्गेट वगैरे न ठेवता आणि घरात बसून आरामात एवढे पैसे कमावल्याचा दावा या महिलेने केला आहे. त्यामुळे या महिलेकडे पैसा कमावण्याची अशी कोणती जादू आहे? असा सवाल केला जात आहे. या महिलेचं नशीब रातोरात कसं बदललं? याचीही चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर या महिलेची कहाणी व्हायरल झाली आहे. या कहाणीने सर्वांना बैचेन केलं आहे. आपणही असं करू शकतो का? हा एकच सवाल या निमित्ताने सर्वांच्या मनात येत आहे. या महिलेच्या दाव्यानुसार, एक वर्षापूर्वी ती एका आयटी प्रोफेशनलमध्ये 10 लाखाच्या पॅकेजवर काम करत होती. पण जुन्या वळणाच्या पद्धतीने गेल्याने अधिक पैसा कमावता येणार नाही. मोठी झेप घेता येणार नाही हे या महिलेच्या लक्षात आलं. त्यामुळे तिने तिचा विचार बदलला आणि नव्या स्ट्रॅटेजीवर काम सुरू केलं.

रिमोट जॉब बनला हत्यार

या महिलेने लोकल कंपन्यांसोबत काम करण्याऐवजी ग्लोबल रिमोट जॉबवर फोकस केला. जगभरात अशा असंख्य कंपन्यात आहेत. ज्या टॅलेंटेड लोकांना घरी बसून काम देतात. त्यांना डॉलर्समध्ये पैसा देतात. या महिलेने अशाच कंपन्यांना टार्गेट केलं. तिचं स्किलही तशाच प्रकारे डेव्हल्प केलं.

लिंक्डइनचा योग्य वापर

आपला पगार 8 पट वाढवण्यासाठी या महिलेने लिंक्डइनचा योग्य असा वापर केला. तिने केवळ जॉब्ससाठी अप्लाय केला नाही, तर इंटरनॅशनल रिक्रूटर्ससोबत थेट नेटवर्क तयार केलं. तिने तिच्या रिज्यूमेला इतकं क्रिस्प आणि अॅट्रॅक्टिव्ह बनवलं की परदेशी कंपन्या स्वत:हून तिला अप्रोच करू लागल्या. 80 लाखाचं पॅकेज मिळवण्यासाठी केवळ अर्ज करणं आवश्यक नव्हतं. तर कम्युनिकेशन स्किल्स आणि टेक्निकल राऊंडसाठी तिने अनेक महिने मॉक इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस केली. घरात बसून ऑफिसपेक्षाही अधिक चांगला आऊटपूट देऊ शकते, असा विश्वास तिने कंपन्यांना दिला. त्यामुळेच तिला घर बसल्या काम मिळत गेले आणि तिचं पॅकेज 80 लाखापर्यंत पोहोचलं.

तुम्ही काय शिकाल?

तुम्हीही तुमच्या करंट सॅलरीवर खूश नसाल तर तुमच्यासाठी हा वेक अप कॉल आहे. तुमच्या स्किल्सला तुम्ही वारंवार अपग्रेड करा. ग्लोबल मार्केटवर नजर ठेवा आणि रिमोट वर्किंगच्या संधी सोडू नका. काय सांगावं पुढचा नंबर तुमचाही असू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in