• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 जूनपासून विमान कंपन्यांचा अत्यंत मोठा निर्णय, ग्राहकांना थेट दणका, देशांतर्गत..

May 29, 2026 by admin Leave a Comment


जर तुम्ही फिरण्याकरिता विमान तिकिट बुक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्याकरिता अत्यंत महत्वाची आहे. जर तुम्ही देशामध्येच विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आजच तात्काळ तुमचे विमान तिकिट बुक करा. नाही तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. भारतातील दोन सर्वात मोठ्या विमान कंपन्या अर्थात इंडिगो आणि एअर इंडिया 1 जून 2026 पासून मोठा निर्णय घेत आहेत. 1 जूनपासून पुढे तीन महिन्यांकरिता त्यांच्या देशांतर्गत विमानसेवा मोठ्या प्रमाणात कमी करत आहेत. विमानांमध्ये कपात करत आहेत. देशांतर्गत मार्गांवरील विमानांची संख्या कमी केल्याने आता विमान तिकिटात मोठी वाढ होऊ शकते. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे विमान कंपन्यांनी आधीच तिकिटांचे दर वाढवले ​​आहेत. त्यामध्येच आता विमानांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला.

एअर इंडिया आपल्या देशांतर्गत विमानसेवांमध्ये अंदाजे 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेत आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोकडूनही आपल्या देशांतर्गत सेवेत 7 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. शाळेला सुट्ट्या लागल्या असून पालक मुलांसह बाहेर फिरण्याकरिता जात असतानाच हा निर्णय विमान कंपन्यांकडून घेण्यात आला.

उड्डाणे कमी करण्याचा हा कल आधीच सुरू झाला आहे. भारतातील चार सर्वात मोठ्या विमान कंपन्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये अंदाजे 6 टक्के कमी उड्डाणे केली. इंडिगोने आपल्या उड्डाणांमध्ये4.5 टक्के आणि एअर इंडियाने 7.5 टक्के कपात केली. एअर इंडिया एक्सप्रेसने याच कालावधीत 17 कमी उड्डाणे केली. एका मागून एक कंपन्या याबाबत निर्णय घेत आहेत. इंधन दरवाढ आणि इंधनाचा तुटवडा यादरम्यानच विमान कंपन्यांकडून हे निर्णय घेतली जात आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका विमान कंपन्यांना बसत आहे. विमानांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करून जे विमान सुरू आहेत, त्याच्या तिकिटाच्या किमतीमध्ये वाढ होणार. यापूर्वी अनेक विमान कंपन्यांनी काही देशातील आपली विमानसेवा कमी करण्याचाही निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्ध अजून काही दिवस चालले तर त्याचे गंभीर परिणाम भारतात अजून बघायला मिळू शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेप्रमाणे कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी घाला! साखर महागताच कुणी केली मागणी?
  • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 3 अन्न आस्थापनांवर FDAची कारवाई; तपासणीत नेमकं काय काय आढळलं?
  • Rupali Thombre Patil : ‘आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही’, चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
  • पर्यटकांची पहिली पसंती! पश्चिम चंपारणच्या ‘या’ वन्यजीव स्थळाला रोज 1,000 सैलानींची भेट
  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in