• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

१४ मिनिटांसाठी तो मृत झाला होता, ११ हजार व्होल्ट वीजेच्या धक्क्यातूनही असा वाचला तरुण…

June 9, 2026 by admin Leave a Comment


स्क्रॅप मेटलच्या शोधात एका बंद पडलेल्या इमारतीत घुसलेल्या एका व्यक्तीने विचारही केला नव्हता की पुढे काही सेंकदात त्याचे जीवन बदलणार आहे. एका स्विचबोर्डाला स्पर्श करताच त्याला ११ हजार व्होल्टचा वीजेचा शॉक बसला, हा धमका इतका मोठा होता की तो अनेक फूट दूर जाऊन कोसळला. डॉक्टरांनी त्याला क्लिनिकली डेड घोषीत केले, तो २९ दिवस कोमात राहिला आणि त्याचे शरीर अर्धे वाईटरित्या भाजले होते. मात्र मृत्यूला टक्कर देऊन तो परतला…

‘द मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनच्या मिडिल्सब्रा येथे राहणाऱ्या डॅरेन हॅरिस यांच्यावर हा भयानक प्रसंग गुदरला होता. साल होते २०२०. त्यावेळी तिचे वय ३३ होते. डॅरेन एका जुन्या आणि रिकाम्या इमारतीत भंगार शोधण्यासाठी गेला होता. त्याला वाटले की इमारत तोडण्याआधी वीजेचे कनेक्शन कापले असेल. परंतू तसेच नव्हते.

स्विचला स्पर्श केल्याने सर्व बदलले…

डॅरेन याने जसा आपला हात एका स्विचबोर्डवर ठेवला तसे त्यांच्या शरीरात ११ हजार व्होल्टचा करंट गेला, ही सिस्टीम सुमारे ९८० घरे आणि ७८ फॅक्ट्री युनिट्सना वीज पुरवठा करणारा होती.

करंट इतका भयानक लागला की त्याच्या दोन्ही हातांची त्वचा आणि मांस जळून हाडापर्यंत पाहचले होते. धमाका झाल्यानंतर त्याच्या शक्तीने तो दूर जाऊन कोसळला. मात्र, तरीही कसे तर सावरत तो या इमारतीच्या बाहेर पडण्यात यशस्वी झाला.

२० दिवस कोमात,१४ मिनिटे मृत घोषीत

अपघातानंतर डॅरेन याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेव्हा त्याची प्रकृती नाजूक स्थितीत होती. डॉक्टरांच्या मते तो दोनदा मृत्यूचा जवळ पोहचला आणि एकदा तर १४ मिनिटे क्लिनिकली डेड झाला.
डॅरेन यांनी सांगितले की मी २९ दिवसांपर्यंत कोमात होतो. माला तीन वेळा सेप्सिस झाला. माझ्या संपूर्ण शरीरात किडनी फेल्युअरसारखी स्थिती होती. मी दोनदा मेलो आणि १४ मिनिटे क्लिनिकली डेड डिक्लेअर झालो.

आरशात स्वत:ला पाहून घाबरलो –

सुमारे एक महिन्यानंतर डॅरेनला शुद्ध आली तेव्हा त्याला वाटले की कदाचित त्याचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलातील आरशात त्याने स्वत:ला पाहिले तर त्याला स्वत:ची भिती वाटली.

डॅरेन याने सांगितले की मी जागा झालो तेव्हा सर्वकाही अजब होते. मी दुखी होतो. रागात होता आणि धक्क्यात होतो. मी स्वत:ला आरशात पाहिले तर मला कळले की माझ्यासोबत काय झाले होते.

३३ सर्जरी, कान आणि नाक गमावले

डॅरेनला शरीराला वाचवण्यासाटी डॉक्टरांनी अनेक अवघड ऑपरेशन केले. त्याच्या पायाची त्वचा घेऊन चेहरा, पोट आणि हाताला पुन्हा तयार करण्यात आले. आतापर्यंत त्याच्यावर ३३ हून अधिक सर्जरी झाल्या आहेत. अपघातात त्याने त्याचे दोन्ही कान गमावले आणि नाकाचा भागही वाईटरित्या क्षतिग्रस्त झाला.

शारीरिक नाही तर , मानसिक वेदनाही झेलल्या

डॅरेन यांनी सांगितले की त्या अपघाताने त्याच्या शरीरालाच नव्हे तर मनाला देखील गंभीर नुकसान पोहचवले. त्याने सांगितले की अनेक वर्षांपर्यंत त्याला PTSD म्हणजे
पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा सामना करावा लागला. अनेकदा जीवनाशी हार मानल्यासारखे वाटू लागले. अनेकदा नैराश्य आले आणि आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र,प्रत्येक वेळी त्याने स्वत:ला सावरल्याचे सांगितले.

आता डॅरेन याला त्याच्या चेहऱ्यावर रिकंस्ट्रक्शन सर्जरी करायची आहे. त्याचे म्हणणे आहे की त्याचा आत्मविश्वास त्यामुळे परत येईल आणि सामान्य जीवन जगता येईल. यासाठी त्याला पैशांची गरज आहे. यासाठी त्याने मोहिम सुरु केली असून १५ हजार पाऊंड जमले आहेत. आता १ लाख पाऊंड जमवण्याचा ध्येय आहे.

इतक्या वेदना आणि संघर्षानंतरही, डॅरेन हार मानायला तयार नाही. तो म्हणतो की, आपल्यावर आलेल्या परिस्थितीच्या माध्यमातून त्याला संकट किंवा कठीण परिस्थितीतून जाणाऱ्यांना धैर्य द्यायचे आहे. “अशा प्रकारचं आयुष्य मी माझ्या कट्टर शत्रूलाही मागू इच्छित नाही,” डॅरेन म्हणतो. “जर माझ्या कथेमुळे एका व्यक्तीला जरी धैर्य मिळालं, तर मला वाटेल की माझं दुसरं आयुष्य सार्थक झालं …



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Venezuela Earthquake : जमीन थरथरली, इमारती कोसळल्या; रस्त्यावर लोकांची धावपळ, भूकंपाचे ५ भयंकर व्हिडिओ पाहून हादरा बसेल
  • Ketan Agarwal Murder Case : ‘मुलीलाही संपवा आता..’, केतन अग्रवाल मर्डर केसवरून भडकली अभिनेत्री
  • Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट, चेतन चौधरीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, माझा मुलगा त्या वेळी…
  • Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रतिक्षा संपली…येणार कर्जमाफीचा मॅसेज, 2019 मधील कर्जमाफीतील शेतकर्‍यांना ही मिळणार लाभ?
  • उद्धव ठाकरेंची साथ सोडताच ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका, थेट राणा जगजीत सिंह पाटील..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in