• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होर्मुज संकटात भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, गॅसचा तुटवडा होणार दूर, भारताला लागला मोठा जॅकपॉट

June 5, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र अजूनही दोन्ही देशांमध्ये संघर्ष कायम आहे. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झालं होतं. इस्त्रायलने इराणवर भीषण हल्ला केला, आणि या युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर अमेरिकेकडून देखील इराणवर हल्ले करण्यात आले. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीने अखेर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम घडवून आला. मात्र पूर्ण युद्धविराम घडवून आणण्यात पाकिस्तानला यश आलं नाही. त्यामुळे जरी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम आहे. आधून मधून दोन्ही देशांकडून हल्ले देखील सुरू आहेत.

दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांसाठी बंद केलं होतं. त्यानंतर अमेरिकेनं देखील या भागात नाकेबंदी लावली. त्यामुळे मध्य पूर्वेतून भारताकडे येणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा साठा ठप्प झाला आहे. त्यामुळे सध्या भारताला मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. देशात मध्यंतरी एलपीजी गॅसची देखील टंचाई निर्माण झाली होती. तसेच कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यानं पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.

मात्र त्यातच आता भारताच्या हाती एक मोठा जॅकपॉट लागला आहे, यामुळे भारामधील गॅस टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. हा जॅकपॉट म्हणजे अंदमानच्या समुद्रात नौसर्गिक वायूच्या विहीरी सापडल्या आहेत, याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी  यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी यासाठी इंडियन ऑइलचं अभिनंदन देखील केलं आहे. होर्मूज संकटात हा भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूच्या विहिरी सापडल्यामुळे गॅसचं संकट दूर होण्यास मदत होणार आहे.

पाकिस्तानात आढळला कच्च्या तेलाचा साठा 

दरम्यान दुसरीकडे पाकिस्तानमध्ये देखील कच्च्या तेलाचा एक मोठा साठा सापडला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हा कच्च्या तेलाचा साठा सापडला आहे. गॅसचा देखील साठा आढळून आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला देखील दिलासा मिळणार आहे.

 

 

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in