
नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेल्या अभिजीत दिपके यांनी या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी ते अमेरिकेमधून भारतात आले, भारतात आल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन उभारण्यात आलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी तब्बल महिनाभर दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता अभिजीत दिपके यांनी ‘टिव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली आहे. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये बोलताना दिपके यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
राजकीय भूमिकेबद्दल दिपके नेमकं काय म्हणाले?
‘आम्हाला राजकीय स्टँड घ्यावाच लागेल, त्या शिवाय राहू शकत नाही. आपण गाडीत पेट्रोल टाकतो, पेट्रोलच्या किंमती राजकारणी ठरवतात. टुथब्रशच्या किंमतीही सरकारच ठरवतं. जे म्हणतात आय एम ए पॉलिटिकल, त्यांना सांगतो तुम्ही ए पॉलिटिकल नाही, तुम्ही इग्नोरंट आहात. मी राजकीय आहे. मी क्लिअरली सांगतो. आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्यामध्ये राजकीय स्टँड घेतला. आम्ही २०२९ पर्यंत पॉलिटिकल स्टँड घेण्याचा ऑप्शन घेतला आहे, आमचा स्टँड हा मुद्द्यांवर असेल, असं यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान माझा कोणत्याही राजकीय पक्षाकडे कल नाही, स्वतंत्र राहा असंच जेन जीला मी सांगेल. राजकीय लोकांमध्ये हिरो बघू नका. तुम्ही इतरांना मोठं कराल तर ते तुमची इज्जत ठेवणार नाही. तुम्ही स्वत तुमचे हिरो बना. राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकारांमध्ये हिरो पाहू नका, असं आवाहान यावेळी अभिजीत दिपके यांनी केलं आहे. दरम्यान आता आम आदमी पक्षाशी माझा संबंध नाही. कॉकरोच जनता पार्टीचाही संबंध नाही. पण आपममंध्ये माझे खूप मित्र आहेत. त्यांच्या संपर्कात आहे. पण पार्टीत संबंध नाही, असंही यावेळी दिपके यांनी स्पष्ट केलं आहे.
Leave a Reply