• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होय… ठाकरेंचे खासदार संपर्कात, बड्या नेत्याने थेट आकडा सांगितल्याने खळबळ; ऑपरेशन टायगरबाबात मोठी माहिती समोर!

June 15, 2026 by admin Leave a Comment


राज्याचा राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता ऑपरेशन टायगरबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल 7 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे विधान केले आहे. तसेच आगामी काळात लवकरच हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही या नेत्याने म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवसेनेचे 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात

शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठं विधान केले आहे. तुमाने म्हणाले की, ‘उबाठामध्ये फारच असंतोष आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर सात खासदारांचा विश्वास आहे. त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे सारखा कर्तव्यनिष्ठ नेता समाजाला न्याय देऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी झालं याची बातमी मिळेल. चर्चा सुरू नाही तर सर्वकाही ठरलं आहे. सर्व चौकशी झाली आहे. फक्त लवकरच ऑपरेशनची तारीख बाकी आहे. लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी झालं याची बातमी मिळेल.’

ठाकरे गटाचे खासदार नाराज?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल आपल्या खासदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला काही खासदार ऑफलाईन तर काही खासदार ऑनलाईन पद्धतीने हजर होते. मात्र आता काही खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदारांना भेटत नाहीत, या खासदारांना मदत केली जात नाही. खासदार भेटायला गेल्यास त्यांची भेट न घेता उद्धव ठाकरे विरोधी नेत्यांना भेटत असल्याने खासदारांनी नाराजी व्यक्त केली असून हे खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

संजय राऊत दिल्लीत

समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकरेंचे काही खासदार हे दिल्लीमध्ये शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले आहेत. सध्या दिल्लीत घडत असलेल्या घडामोडी लक्षात घेता ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत. डॅमेज कंट्रोलची जबाबदारी आता राऊत यांच्यावर देण्यात आली असल्याचे समोर आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in