• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होणाऱ्या बायकोला सांगून ट्रेकिंगला गेला अन् इंजिनिअर अचानक गायब ! सर्च हिस्ट्रीने वाढलं टेन्शन

August 11, 2026 by admin Leave a Comment


बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील शिवगंगे डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेला 31 वर्षीय सॉफ्टवेअर प्रोफेशनल अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. IITचा माजी विद्यार्थी असलेला अद्वैत उपाध्याय 7 ऑगस्ट रोजी सकाळी एकट्याने ट्रेकिंगसाठी गेला होता, मात्र तो परत आलाच नाही. त्याच डोंगराच्या पायथ्याशी त्याची बाईक तर सापडली आणि मोबाईलचा शेवटचा सिग्नल नेहमीच्या ट्रेकिंग मार्गापासून दूर असलेल्या भागात मिळाला. पण अद्वैतचा कुठेच मागमूस नव्हता. अद्वैतच्या शोधासाठी पोलीस, NDRF, SDRF आणि वन विभागाच्या पथकांनी मोठी शोधमोहीम सुरू केली असून तब्बल 100 जण डोंगराचा कोपरा न् कोपरा पिंजून काढत आहेत. दरम्यान, ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या शोधात शांतला ड्रॉपच्या खाली झुडपांमध्ये मानवी शरीरासारखी दिसणारी वस्तू आढळल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. मात्र, ती व्यक्ती अद्वैतच आहे का, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

सकाळी ट्रेकिंगला निघाला, पण परतलाच नाही

मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवासी असलेला अद्वैत हा बंगळुरूच्या व्हाइटफिल्ड येथील एका फायनान्स कंपनीत काम करत होता. कडुगोडी परिसरात राहणाऱ्या अद्वैतने 7 ऑगस्ट रोजी एक बाइक भाड्याने घेतली आणि शिवगंगे डोंगरावर ट्रेकिंगसाठी जात असल्याचं त्याच्या होणाऱ्या पत्नीला, प्राप्ती  हिला सांगितलं. CCTV फुटेजमध्ये अद्वैत सकाळी सुमारे 7.30 वाजता शिवगंगे डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताना आणि त्यानंतर ट्रेकिंगला सुरुवात करताना दिसला होता. दुपारपर्यंत तो परत येणं अपेक्षित होतं. मात्र, बराच काळ उलटूनही तो परतला नाही. त्याच्या होणाऱ्या पत्नीने फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलही बंद असल्याचे आढळले. अखेर चिंतेत असलेल्या प्राप्ती यांनी कडुगोडी पोलीस ठाण्यात अद्वैत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर नेलमंगला आणि डोब्बासपेट पोलिसांनाही माहिती देण्यात आली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.

बाइक तिथेच… मग कुठे गेला अद्वैत ?

तपासादरम्यान अद्वैतची बाइक शिवगंगे डोंगराच्या पायथ्याशीच सापडली. त्यामुळे तो बाइकवरून तेथून निघून गेला नसल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशनही तपासलं. तेव्हा त्याचा फोन कुनिगल रोडवरील कुदुरु परिसरात शेवटचा ट्रेस झाला आणि त्यानंतर मोबाईल बंद झाला. विशेष म्हणजे, हे लोकेशन शिवगंगेच्या नेहमीच्या ट्रेकिंग रूटपासून वेगळं असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अद्वैत नेमका कुठे गेला होता आणि तो नेहमीच्या मार्गापासून दूर का गेला, याचा शोध घेणे पोलिसांसमोरचं मोठे आव्हान ठरलं आहे.

शांतला ड्रॉपवर विशेष लक्ष; ड्रोनमध्ये काय दिसलं?

सध्या शोधमोहीमेचा सर्वाधिक भर शांतला ड्रॉप परिसरावर आहे. शिवगंगे डोंगरावरील हा भाग अत्यंत धोकादायक मानला जातो. उंच कडे, तीव्र उतार, दाट झाडी आणि दुर्गम भूप्रदेशामुळे बचाव पथकांना येथे पोहोचणेही कठीण झालं आहे. त्यामुळे या भागात ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे. याचदरम्यान शांतला ड्रॉपच्या खाली दाट झुडपांमध्ये एक वस्तू आढळली. ती मानवी शरीरासारखी दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बचाव पथकं अजून तिथे पोहोचू शकलेली नसल्यामुळे ते नेमकं शरीर आहे की काय, याची पुष्टी झालेली नाही.

लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीनेही वाढवले गूढ

अद्वैतच्या बेपत्ता होण्यामागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या लॅपटॉपची ब्राउझिंग हिस्ट्री तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, लॅपटॉपमध्ये शिवगंगे डोंगर, परिसर आणि शांतला ड्रॉपशी संबंधित माहिती सर्च केल्याचे आढळून आलं. एवढंच नव्हे तर बेंगळुरू परिसरातील आत्महत्येच्या ठिकाणांशी संबंधित काही सर्चही आढळल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वेगळीच शंका निर्माण होत आहे.

मात्र, या माहितीच्या आधारे पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. अद्वैतच्या बेपत्ता होण्यामागे अपघात, दुर्गम भागात अडकणे किंवा अन्य कोणतंही कारण असू शकतं, त्यामुळेया सर्व शक्यतांशी निगडीत तपास केला जात आहे.

जानेवारीत ठरली होती लग्नाची तारीख

अद्वैत हा IITचा माजी विद्यार्थी असून त्याने सायबर सिक्युरिटीमध्ये मास्टर्स केलं आहे. तो मूळचा इंदूरचा असून घरचे व्यावसायिक आहेत. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात अद्वैतचा विवाह होणार होता. दरम्यान, शिवगंगे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शोधमोहीम आणखी कठीण झाली आहे. चिखल, घसरडे उतार, दाट झाडी आणि धोकादायक कडे यामुळे बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in