
वास्तूशास्त्रात घरातील शुख आणि शांतीसाठी एका झाडाला विशेष महत्त्व आहे. हे झाड योग्य दिशेला लावल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते असे मानले जाते. विशेष म्हणजे या झाडाने घरात सापदेकखील येत नाही, असे मानले जाते.
हे झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर घरातील सगळी नकारात्मक उर्जा नष्ट होते, असे वास्तूशास्त्रात सांगितले जाते. तसेच सकारात्मक उर्जेमुळे घरातही लक्ष्मी नांदते असे मानले जाते.
या झाडाचे नाव सर्पगंधा असे आहे. सर्पगंधा हे झाड खूप शुभ मानले जाते. या झाडाला घराच्या सुरक्षेशी जोडले जाते. हे झाड घराच्या आसापास असेल तर एक वेगळीच शांतता निर्माण होते. सगळी कामे लवकर होतात, असे मानले जाते.
सर्पगंधा या झाडाला एक विशेष गंध असतो. हा गंध सापाला आवडत नाही, असे मानले जाते. म्हणूनच तुम्ही हे झाड बागेत किंवा अंगणात लावल्यास तुमच्या घराच्या आसपासही साप फिरकत नाही, असा दावा केला जातो.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply