• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही तर सियापेक्षा भयानक.., घरात पतीचा मृतदेह, रक्तबंबाळ मुलगा जमिनीवर; बेडवर झोपून ती मात्र..

July 16, 2026 by admin Leave a Comment


वर्षभरापूवी सोनम रुघवंशीने लग्नानंतर हनिमूनला गेल्यावर पतीला मारलं, कुठे निळि्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह लपवण्यात आला. तर सिया गोयलने होणाऱ्या पतीला, केतन अग्रवालला लोहगडावरून धक्का देऊन मारलं… देशभरात खुनाच्या, हिंसेच्या अशा एकाहून घटना घडत असून रोज त्या ऐकून, वाचून लोकं अक्षरश: हादरलेत. मात्र हे कमी की काय म्हणून कर्नाटकच्या धारवाडमध्ये आणखी एक भयाक, नृशंस प्रकार घडला आहे. धारवाड शहरात एका डॉक्टरच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अपार्टमेंटमध्ये राहणारे भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नावर यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला, तर त्यांचा अवघा 8 वर्षांचा मुलगाही घरात जखमी अवस्थेत सापडला. याप्पकरी पोलिसांना डॉ. होन्नावर यांच्या पत्नीवर संशय असून तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. जखमी मुलाला नजीकच्या रुग्णालयात दाख करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉ. किरण होन्नावर (वय 45) हे धारवाडमधील पवन हायस्कूलसमोरील एका अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर पत्नी डॉ. प्रियंका कट्टनहल्ली आणि मुलासोबत राहत होते. डॉ. किरण हे एका खासगी रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते, तर त्यांची पत्नी, डॉ. प्रियंका या नेत्ररोगतज्ज्ञ असून त्यांनी ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये एमएस पदवी प्राप्त केली आहे.

घरात पतीचा मृतदेह आणि पत्नी मोबाईल बघत बसली

पोलिस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. किरण यांच्याशी बुधवारी त्यांच्या नातेवाईकांनी तसेच मित्रांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांचा फोन पत्नी प्रियंका यांनी उचलला. डॉ. किरण विश्रांती घेत आहेत, ते ड्युटीवर गेले आहेत, अशी विविध उडवाउडवीची उत्तर त्यांनी यावेळी दिली. मात्र यामुळे संशय वाढला आणि पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठलं आणि फ्लॅटमध्ये प्रवेश केला. समोरचं दृश्य पाहून ते क्षणभर हादरलेच. कारण त्याच फ्लॅटच्या एका खोलीत डॉ. किरण हे मृतावस्थेत आढळलेला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी होऊन खाली पडलेला होता. मात्र मुलाचे श्वासोच्छ्वास सुरू असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सर्वात हैराण करणारी आणि तितकीच हादरवणारी गोष्ट म्हणजे, फ्लॅटमध्ये आत शिरल्यावर पोलिसांनी एका व्हिडीओ बनवला. त्यात असं दिसून आलं की घरात एकीकडे डॉक्टर पतीचा मृतदेह होता, खाली निरागस मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत जखमी पडला होता. पण याचं काहीच सोयरसुतक नसल्याच्या आविर्भावात, पत्नी, डॉ.प्रियांका ही अतिशय बेदरकारपणे बेडवर झोपून मोबाईल वापरत होती. यामुळे सगळेच हैराण झाले.

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पाहणीत घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. प्राथमिक तपासानुसार, घटना घडली त्या वेळी फ्लॅटमध्ये केवळ पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा उपस्थित होता. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, हल्ला कधी झाला आणि त्याआधी किंवा त्यानंतर काय घडले, याचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान मुलाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळल्या आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विविधेतील एकता हाच भारताच आत्मा, सरसंघचालक मोहन भागवतांचा अमेरिकेतून संदेश, धर्माबाबत मोठे चिंतन
  • Petrol Diesel Price Today : 115 रूपये पेट्रोल, 104 डिझेल, तेलाच्या किमतीत मोठे बदल..
  • शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
  • 9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
  • किचनमध्ये जाताच राग येतोय, चिडचीड होतेय? वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in