• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही तर फक्त सुरुवात आहे, पंतप्रधान मोदी यांनी केले विक्रम-1 टीमचे अभिनंदन

July 18, 2026 by admin Leave a Comment


भारतातील अंतराळ संस्थेला मोठे यश मिळाला आहे. शनिवारी (18 जुलै) स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम -1 रॉकेटचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या टीमशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी या कामगिरीला भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या अंतराळ क्षेत्रातील मोठे यश असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसचे संस्थापक पवन चंदना, नागा भरत डाका आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. ही भारताच्या अंतराळ प्रवासातील एक नवा मैलाचा दगड आहे. हे यश म्हणजे केवळ सुरुवात असून, अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी ट्विट करताना म्हटले की, आज सकाळी 11.30 वाजता, स्कायरूट एरोस्पेस भारताचे पहिले खासगीरित्या विकसित केलेले प्रक्षेपण वाहन विक्रम-1 चे पहिले कक्षीय (ऑर्बिटल) प्रक्षेपण करणार आहे. हे चार टप्प्यांचे रॉकेट जलद आणि मागणीनुसार उपग्रह प्रक्षेपण सेवा देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. ही मोहीम आपल्या देशातील तरुणांच्या प्रतिभा, जिद्द आणि उद्योजकीय वृत्तीचे प्रतीक आहे. तसेच, अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे नवकल्पना आणि उद्योगांसाठी निर्माण होत असलेल्या नव्या संधींचेही हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

A historic new frontier for India’s space journey!

At 11:30 AM today, Skyroot Aerospace will undertake the maiden orbital launch of Vikram-1, India’s first privately developed launch vehicle.

This four-stage rocket is designed to provide rapid and on-demand launch services.… pic.twitter.com/1qFVTwNOuZ

— Narendra Modi (@narendramodi) July 18, 2026

स्कायरूट एरोस्पेसच्या संपूर्ण टीमला यशस्वी प्रक्षेपणासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. ‘विक्रम-1’ आकाशात उंच भरारी घेऊन इतिहास घडवो आणि नव्या पिढीसा प्रेरणा देवो. मी सर्व भारतीयांना, विशेषतः माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींना, या ऐतिहासिक मोहिमेचे कौतुक करण्याचे आणि टीम स्कायरूटला शुभेच्छा देण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करतो.

पंतप्रधान मोदींचा हस्तलिखित वंदे मातरम् संदेश अंतराळात

विक्रम-1 रॉकेटद्वारे एका सूक्ष्म कलाकृतीचा पेलोड तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हस्ताक्षरात लिहिलेला ‘वंदे मातरम्’ संदेश असलेले पोस्टकार्डही अंतराळात पाठविण्यात आले. याशिवाय, भारतीय अभियंते, शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळवीर यांच्या हस्तलिखित संदेशांची पोस्टकार्डेही या मोहिमेद्वारे अंतराळात पाठविण्यात आली. ‘मिशन आगमन’ या नावाने पार पडलेले हे प्रक्षेपण भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा मानले जात आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in