• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हिरवा, निळा की पिवळा… कोणत्या डस्टबिनमध्ये कोणता कचरा टाकायचा ? 99 % लोकांना माहीत नसेल याचं योग्य उत्तर !

September 3, 2026 by admin Leave a Comment


घरात असो वा बाहेर अनेकदा कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे डस्टबिन असतात. खरंतर हिरवा किंवा निळ्या रंगाचा डस्टबीन खूप कॉमन आहेत. पण ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी नक्की कोणत्या रंगाच्या डस्टबिनचा वापर करावा, हे तुम्हाला माहीत आहे का ? (Image Source | iStock)

हिरव्या डस्टबिनचा वापर सामान्यतः ओल्या आणि सेंद्रिय कचऱ्यासाठी केला जातो. म्हणजेच असा कचरा, ज्याचं सहजपणे विघटन होऊ शकतं आणि त्यापासून खत तयार करता येतं. या डब्यात तुम्ही भाज्या आणि फळांची सालं, उरलेलं अन्न, खराब झालेलं किंवा कुजलेल्या फळं-भाज्या, भाज्यांची पानं इत्यादी टाकू शकता. यामुळे या कचऱ्यापासून सहजपणे कंपोस्ट किंवा खत तयार करता येते.

तर निळ्या डब्याचा वापर सामान्यतः सुका आणि पुनर्वापर करता येणारा कचरा टाकण्यासाठी केला जातो. या डब्यात असा कचरा टाकला जातो, ज्यावर पुन्हा प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येतो. कागद, जुनी वर्तमानपत्रं, कार्डबोर्ड, स्वच्छ प्लास्टिकच्या बाटल्या किंवा कंटेनर, काचेच्या बाटल्या आणि विविध प्रकारचे पॅकेजिंग साहित्य यांसारख्या कोरड्या वस्तू निळ्या डब्यात टाकता येतात.

सामान्यतः भारतात पिवळ्या डस्टबिनचा वापर बायोमेडिकल कचरा टाकण्यासाठी केला जातो. यामध्ये मानवी किंवा प्राण्यांच्या शरीराचे अवशेष, टिश्यू, दूषित कापूस, ड्रेसिंगचे साहित्य, मुदत संपलेली औषधे, रासायनिक कचरा आणि प्रयोगशाळेतून निघणारा विशिष्ट प्रकारचा जैववैद्यकीय कचरा यांचा समावेश होतो. वैद्यकीय कचरा, सामान्य कचऱ्यात टाकणं हे योग्य मानलं जात नाही.

तर काही प्रकारचा कचरा असा असतो जो सामान्य ओल्या किंवा सुक्या कचऱ्यासोबत मिसळणं योग्य मानलं जात नाही. बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बल्ब, पेंट किंवा रसायनं यांसारख्या वस्तूंसाठी स्वतंत्र कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता असू शकते. टीप : ही माहिती उपलब्ध स्त्रोतांवरून दिली आहे. डस्टबिनच्या रंगांबाबतचे नियम स्थानिक कचरा व्यवस्थापनाच्या पद्धतीनुसार बदलू शकतात. त्यामुळे TV9 कोणत्याही प्रकारच्या माहितीची पुष्टी करत नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?
  • Today Horoscope : 4 राशींना आयुष्यात सगळं मिळणार, स्वप्न होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य काय?
  • EPF vs NPS: महिन्याला 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर निवृत्तीनंतर कशात जास्त पैसा ?
  • आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाचं झंझावाती शतक, एका झटक्यात दोन विश्वविक्रम मोडले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in