• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हा तर नटवरलालचा बाप निघाला ! रणवीर सिंग, अमिताभ बच्चन, आमिर खान सोबत काम करणारा निघाला खुनी, 12 वर्षांनी…

May 22, 2026 by admin Leave a Comment


Murder Convict Arrested : नटवरलालचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच.. अनेक गुन्हे करून तो गायब व्हायचा असं बोललं जातं. त्य़ाला पकडणं पोलिसांसाठी अत्यंत जिकीरीचं झालं होतं. असंच काहीसं एक प्रकरण गुजरातमधून समोर आलं आहे. एका व्यक्तीला हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं त्यानंतर तो हायकोर्टाकडून प2रोल मिळवण्यात यशस्वी झाला. तुरूंगातून पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर मात्र तो परत कधीच आला नाही. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे याच काळात तो अमिताभ बच्चन, आमिर खान, रणवीर सिंग यांसारख्या कलाकारांसोबत काम करत होता, एवढंच नव्हे तर साऊनथ मध्ये मोहनलाल यांच्यासारख्या अभिनेत्यासोबतही त्याने चित्रपट केले. आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक जीवनात कार्यरत राहूनही साधे, सामान्य नागरिक तर सोडा पण पोलिसही त्याला ओळखू शकले नाही. अखेर गुप्त माहितीच्या आधारे तब्बल 1 तपानंतर, 12 वर्षांनी त्याला पकडण्यात यश मिळालं.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 12 वर्षे फरार असलेल्या या इसमाची ओळख पटली असून हेमंत नागिंदास पुरुषोत्तम दास मोदी असं त्याचं नाव असून तो गुजरातचा रहिवासी असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे, पॅरोवर बाहेर आल्यानंतर तो या काळात तो बनावट नावाने चित्रपटसृष्टीत सक्रिय होता आणि चित्रपट, वेब सिरीज व नाटकांमध्ये अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करत होता. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शोध शाखेने (DCB) अखेर गुरूवार त्याला अटक केली. हा मारेकरी हेमंत चित्रपटसृष्टीत मात्र ‘स्पंदन मोदी’ या नावाने ओळखला जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2008 साली एका खून प्रकरणात हेमंतला दोषी ठरवण्यात आले होते. 15 जून 2005 रोजी नरेंद्र उर्फ ​​​​नानो यशवंत कांबळे यांच्या हत्येप्रकरणी हेमंत, त्याचा भाऊ सचिन मोदी आणि इतर पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोषी ठरल्यानंतर, हेमंत मोदीला प्रथम साबरमती मध्यवर्ती कारागृहात आणि नंतर मेहसाणा कारागृहात पाठवण्यात आले, जिथे त्याची ओळख कैदी क्रमांक 31146 अशी होती.

पॅरोल मिळताच झाला फरार

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जवळपास सहा वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर, 25 जुलै 2014 रोजी गुजरात उच्च न्यायालयाने हेमंतला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला. मात्र, पॅरोलवर सुटल्यानंतर हेमंत हा तुरुंगात परतलाच नाही आणि चक्क फरार झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यासोबत दोषी ठरलेल्या इतर सहा जणांनी तुरूंगात राहून आपली शिक्षा पूर्ण केली, ते आता सामान्य जीवन जगत आहेत, पण हेमंत मात्र फरारच होता. ” पॅरोलवर असताना फरार झाल्यानंतर हेमंत सुरुवातीला सुमारे एक वर्ष पाटण जिल्ह्यात लपून राहिला. त्यानंतर त्याने आपले नाव बदलून ‘ट्विंकल मुकुंद दवे’ ठेवले आणि तो अहमदाबादला गेला. तिथे त्याने एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली आणि पेइंग गेस्ट म्हणून राहू लागला. याच काळात त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला” असं तपास अधिकारी, पोलीस निरीक्षक पी. एम. धखरा यांनी सांगितलं.

अमिताभ बच्चन ते आमिर खान, अनेक अभिनेत्यांसोबत केलं काम

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, थिएटरमधून हेमंतने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि काही वर्षांतच तो मुंबईला स्थलांतरित झाला. तिथे त्याने छोट्या भूमिका केल्या आणि हळूहळू चित्रपटसृष्टीत ओळख मिळवली. ‘स्पंदन मोदी’ या नावाने तो अनेक हिंदी, गुजराती आणि मल्याळम चित्रपटांमध्ये झळकला होता. एवढंच नव्हे तर त्याने ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटामध्ये बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यासोबतही काम केलं होतं. रणवीर सिंग आणि बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटातही तो झळकला होता. तसेच आदित्य रॉय कपूर, सारा अली खानच्या ‘मेट्रो… इन दिनों’ मध्येही तो दिसला.

एवढंच नव्हे तर मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘L2: एम्पुरान’ या चित्रपटातही त्याची भूमिका असल्याचे बोलले जाते. आरोपी हेमंत हा ‘लाहोर 1947 ‘ आणि ‘तू है मेरी किरण’ या आगामी चित्रपटांशी देखील निगडीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने अंदाजे 20 गुजराती चित्रपट, अनेक टीव्ही मालिका, ‘तस्करी’ ही वेब सिरीज आणि ‘युगपुरुष’ व ‘गांधी वर्सेस गोडसे’ यांसारख्या लोकप्रिय नाटकांसह 17 गुजराती नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

कुटुंब, पत्नीशी तोडलं नातं

समोर आलेल्या माहितीनुसार, तुरुंगातून बाहेर आल्यावर हेमंत मोदी याने त्याची खरी ओळख लपवण्यासाठी तो कुटुंबीय आणि मित्रांपासून दूर राहिला. हे कमी की काय म्हणून त्याने पत्नीलाही घटस्फोट दिल्याचे समोर आले आहे, सोशल मीडियापासूनही तो लांबच होता. त्याचे डिजिटल अस्तित्व जवळजवळ नव्हतंच, त्यामुळेच त्याचा शोध घेणं पोलिसांसाठी अत्यंत कठीण बनलं होतं. इन्स्पेक्टर धाखडा यांच्या म्हणण्यानुसार, 2025 साली हेमंत अहमदाबादला परत आला होता. त्याच काळात, कोणीतरी त्याला ओळखले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तुरुंगातील नोंदींवरून त्याचे रूप आणि शारीरिक वैशिष्ट्ये पडताळू पाहण्यात आली. जुळवण्यात आली. जी तंतोतंत जुळली. अखेर चौकशीदरम्यान, त्याने आपली खरी ओळख कबूल केली. पळून जाण्याच्या वेळी त्याला कोणी कोणी कोणाला मदत केली आणि चित्रपटसृष्टीत त्याने आपली ओळख कशी निर्माण केली, याचा तपास पोलीस आता करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in