• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र…, कंगना राणौतने उरकलं गुपचूप लग्न! ‘कोण आहे मुलगा?’

May 22, 2026 by admin Leave a Comment


Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी लग्न केलं आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.., कारण कंगना यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या लूकची चर्ता रंगत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी विचारलं की लग्न झालं का? कंगना यांनी गुपचूप लग्न केलं का? नवरा मुलगा कोण आहे? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कंगना रणौत घरातून बाहेर पडून आपल्या गाडीकडे जाताना दिसत आहे. फिकट गुलाबी रंगाचा सूट आणि कपाळावर टिकली लावलेल्या कंगनाने पापाराझींना पाहिलं, पण कंगना त्यांच्याशी न बोलता शांतपणे निघून गेल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

एका नेटकऱ्याने कमेंट करत विचारलं, ‘मंगळसूत्र? कंगना हिचं लग्न झालं का?’, अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘व्हिडीओ कदाचित सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा आहे…’, तर काही नेटकरी असं देखील म्हणत आहेत की, कंगना यांनी गुपचूप लग्न उरकलं आहे… पण समोर येत असलेल्या माहितीनुसार, कंगना यांनी लग्न केलं नसून, आगामी ‘तनू वेड्स मनू 3’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा व्हिडीओ आहे.

सांगायचं झालं तर, कंगना राणौत सध्या ‘क्वीन 2’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये देखील व्यस्त आहे. राजकारणात दमदार एन्ट्री केल्यानंतर कंगना यांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केलं आहे. कंगना यांनी 2024 मध्ये भाजपच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला.

कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कंगना राणौत यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी स्वतःची ओळख भक्कम केली आहे. मबत्त्वाची गोष्ट म्हणजे कंगना आता फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in