• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वस्तात मस्त पोस्टपेड प्लॅन हवा ? BSNL च्या या प्लॅनमध्ये मिळतात भन्नाट फायदे; किंमत फक्त..

July 17, 2026 by admin Leave a Comment


सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त आसा पोस्टपेड मोबाईल प्लान आहे. जिथे खासगी टेलिकॉम कंपन्यांचे पोस्टपेड प्लॅन साधारणपणे 400 रुपयांपासून सुरू होतात, तिथे BSNL अवघ्या 199 रुपयांत पोस्टपेड प्लॅन देत आहे. विशेष गोष्ट म्हणजे म्हणजे, कमी किमतीतही या प्लॅनमध्ये अनेक उपयुक्त सुविधा मिळतात. BSNL चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन दरमहा 199 रुपयांचा असून, ही ग्राहकांसाठी निश्चित मासिक किंमत आहे. या प्लॅनसोबत कंपनी डेटा रोलओव्हरची सुविधाही दिली जाते.

BSNL च्या 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळतं तरी काय ?

BSNL कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दरमहा 25 GB हाय-स्पीड डेटा, देशभरात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. याशिवाय, या प्लॅनचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे 75 GB पर्यंत डेटा रोलओव्हरसुविधा. म्हणजे एखाद्या महिन्यात डेटा पूर्ण वापरला गेला नाही, तर तो तिथेच संपत नाही, तर ग्राहकांना तो डेटा पुढल्या महिन्यातही वापरता येऊ शकतो. मात्र, या प्लॅनमध्ये फॅमिली ॲड-ऑन कनेक्शनची सुविधा उपलब्ध नाही.

TelecomTalk च्या माहितीनुसार, या किंमत श्रेणीत इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी पोस्टपेड मोबाईल प्लॅन देत नाही. दरमहा 199 रुपयांत ग्राहकांना भरपूर डेटा आणि इतर आकर्षक फायदे मिळतात. आजच्या घडीला पहायला गेलं तर, देशातील अनेक प्रीपेड प्लॅनची किंमतही जवळपास इतकीच आहे. उदाहरणार्थ, तुम्ही Airtel किंवा Jio चा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन घेतला, तरी तुम्हाला 25 GB डेटा किंवा पूर्ण एका महिन्याची वैधता मिळत नाही.

Jio चा 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय ?

Jio च्या 199 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा आणि 18 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच, एकूण 27 GB डेटा हा ग्राहकांसाठी उपलब्ध होतो. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS, तसेच JioTV आणि Jio AI Cloud Storage चा मोफत वापर करण्याची सुविधाही दिली जाते.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: भूकंप, पाऊस की हिमस्खलन.. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराचं खरं कारण समोर
  • Rule Change : LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल, काय काय महागणार?
  • सायबर अधिकाऱ्याने यावेळी घरातून उचललं पण.. समय रैनाच्या टोलेबाजीने मुख्यमंत्र्यांनाही हसू अनावर, Video नक्की पाहा
  • Ankit Baliyan: प्रसिद्ध गायकावर जिमबाहेर झाडल्या 20 गोळ्या; मृतदेह रस्त्यावर ठेवत कुटुंबीयांचा आक्रोश
  • Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्ग कोपला, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर, ही माहिती तयार ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in