
आजचे स्मार्टफोन फक्त कॉलिंग आणि चॅटिंगसाठी मर्यादीत राहिलेले नाहीतर आता फोनवर तासंतास गेमिंग, 4k व्हिडिओ रेकॉर्डिंग, सोशल मीडिआ स्क्रोलिंग आणि मल्टीटास्किंग यासारख्या अनेक गोष्टी फोनमध्ये केल्या जात आहेत. जेव्हा फोनचा वापर जास्त होतो तेव्हा स्मार्टफोन गरम होणे हे एक सामान्य आहे. पण तुम्हाला माहित आहे का की अनेक स्मार्टफोनमध्ये एक अस तंत्रज्ञान आहे जे फोन गरम झाल्यावर त्याला त्वरित थंड करते. जेव्हा एखादा फोन लाँच केला जातो, तेव्हा कंपनी फोनमध्ये केवळ त्याचा प्रोसेसर आणि कॅमेरा यांचाच उल्लेख करत नाही, तर व्हेपर चेंबर (VC) कूलिंग या आणखी एका वैशिष्ट्यावर अनेकदा प्रकाश टाकते. सध्या हे वैशिष्ट्य फक्त गेमिंग फोन किंवा फ्लॅगशिप फोनमध्ये पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य सध्या बजेट स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नाही. व्हेपर चेंबर ही एक कूलिंग सिस्टीम आहे, जी स्मार्टफोनमधील उष्णता बाहेर काढून डिव्हाइसला थंड ठेवते. चला तर मग आजच्या लेखात आपण व्हेपर चेंबर म्हणजे काय आणि ते कसे काम करते याबद्दल जाणून घेऊयात.
व्हेपर चेंबर म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
फोनमधील व्हेपर चेंबर हे एक पातळ सील केलेले धातूचे प्रकार असून त्यात थोड्या प्रमाणात द्रव भरलेला असतो. फोन गरम झाल्यावर, त्या द्रवाचे वायूमध्ये रूपांतर होते आणि फोन थंड होतो. जेव्हा जेव्हा फोन गरम होत राहतो तेव्हा ही प्रक्रिया सतत चालू राहते. ज्यामुळे फोन थंड राहतो.
फोनसाठी हे महत्त्वाचे का आहे?
जेव्हा फोन खूप गरम होत असतो, तेव्हा त्याची कार्यक्षमता कमी होते आणि या स्थितीला थर्मल थ्रॉटलिंग म्हणतात. यामुळेच गेम खेळताना तुम्हाला फ्रेम ड्रॉप्सचा अनुभव येऊ शकतो. व्हेपर चेंबर फोनला थंड ठेवतो, ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ गेम खेळू शकता. व्हेपर चेंबर थर्मल थ्रॉटलिंग टाळण्यास मदत करतो.
चार्जिंग करतानाही फोन थंड राहतो
गेमिंग फोन असो फ्लॅगशिप या फोनमध्ये सुपर फास्ट चार्जिंगची सुविधा आहे, ज्यामुळे जलद चार्जिंग प्रक्रियेदरम्यान फोनमध्ये खूप उष्णता निर्माण होते. या दरम्यान व्हेपर चेंबर फोनला थंड ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे तो अधिक वेगाने चार्ज होतो.
बॅटरी लाईफ चांगली राहते
फोनमधील अतिरिक्त उष्णता बॅटरीसाठी धोकादायक असते. जास्त तापमानामुळे बॅटरी झपाट्याने खराब होऊ शकते आणि अनेक प्रकरणांमध्ये, तिचा स्फोट होण्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत व्हेपर कूलिंग चेंबर फोनला थंड ठेवून बॅटरी लाईफ जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत करते.
Leave a Reply