
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण बघायला मिळाली. चांदीच्या दरात मोठी घसरण होऊन ती प्रति किलो 2.36 लाख रुपयांच्या पातळीवर आली आहे.
सोन्याचे दरही कमी झाले आहेत. तरीही सोन्याचा भाव 1.50 लाख रुपयांवर आहे. MCX वर 5 ऑक्टोबर रोजी मुदत संपणाऱ्या गोल्ड फ्युचर्सचा व्यवहार दर 1,52,225 रूपये प्रति ग्रॅम पोहोचला.
शुक्रवारी 1,52,767 वर व्यवहार बंद झाला होता. म्हणजेज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव एका झटक्यात 542 ने स्वस्त झाला. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार बघायला मिळतोय.
त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन लोकांना केले. इराण आणि अमेरिका युद्धात सोने स्वस्त होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव चांगलेच वधारले होते. मात्र, पुन्हा एकदा आता सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. जागतिक बाजारात सोन्याबाबत अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.




Leave a Reply