• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोन्याचा मोठा झटका! तब्बल 2000 रुपयांनी वाढ, एक ग्रॅम सोन्यासाठी लागणारी तब्बल…

May 24, 2026 by admin Leave a Comment


सध्या जागतिक पातळीवर मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. इंधन संकटामुळे महागाई वाढली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही झाला आहे. सोन्याचा भाव कधी वाढताना तर कधी कमी होताना दिसतेय.

गेल्या आठवड्यारात सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. एका आठवड्याची तुलना करायची झाल्यास गुड रिटर्न्स या अर्थविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार एका आठवड्यात एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 213 रुपयांनी वाढला आहे. म्हणजेच सोनं महागलं आहे.

या संकेतस्थळानुसार 17 मे रोजी एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 15693 रुपये आहे. हाच भाव 24 मे रोजी 15906 रुपये प्रति ग्रॅम इतका वाढला आहे. म्हणजेच एका ग्रॅममागे सोन 213 रुपयांनी वाढलं आहे.

एका तोळ्याची तुलना करायची झाल्यास 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 2130 रुपयांनी वाढला आहे. म्हणजेच एका आठवड्यात सोन दोन हजार रुपयांपेक्षाही वाढलं आहे. आगामी काळात जागतिक पातळीवरील तणाव असाच कायम राहिला तर ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
  • Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in