• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

July 18, 2026 by admin Leave a Comment


सामाजिक कार्यकर्ते आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षणमंत्र्याच्या राजीनामा मागण्यासाठी उपोषण सुरु केले आहे. त्यांना आज उपोषणाच्या २१ व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात जबरदस्ती दाखल केले. त्यांची तब्येत ढासळल्याने सरकारने हा निर्णय घेतला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांत झटापट देखील झाली.

सोनम वांगचुक यांनी गेल्या २१ दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. बॉलीवूडच्या जवळपास सर्वच कलाकार त्यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत, निदान समाजमाध्यमात व्यक्त होत आहेत. शुक्रवारी अभिनेते शेखर सुमन यांनी देखील सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. ‘शो मुव्हर्स एंड शेकर्स’ मध्ये देखील त्यांनी या मुद्यावर आपले मत मांडले आणि गंभीर वक्तव्य केले आहे. या ‘शो मुव्हर्स एंड शेकर्स’मध्ये शेखर सुमन हे देशातील अनेक राजकीय मुद्यांवर व्यक्त होत असतात.

काय म्हणाले शेखर सुमन?

शेखर सुमन सोनम वांगचुक म्हणाले की सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अनेक दिवसांपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण सुरु केले आहे. मी हैराण आहे हे पाहून कोणी हैराण का नाही ? एक माणूस देश आणि समाजाच्या भल्यासाठी उपोषणाला बसला आहे. स्टुडट्सच्या भविष्यासाठी उपोषण करत आहे. शिक्षणाच्या ढासळत्या ढाच्याला सांभाळण्यासाठी उपोषणावर बसला आहे आणि व्यवस्था आराम पहुडली आहे.

जी व्यवस्था न केवळ मुकी, बहीरी आणि संवेदनहीनच नसून तंग दिल, संग दिल आणि बेदिल आहे. थकलेल्या ऊर्जाहीन शरीरात भलेही शक्ती नसेल पण देशातील लाखो तरुणांची ते ताकद आहेत. जर नीट निरखून पाहिले तर आपल्या जीवंत मृतदेहात ते एकटे जीवीत आहेत. मी हैराण आहे हे पाहून की कोणी हैराण का नाही ?

सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टी ( CJP ) सोबत उपोषण करीत होते. २० जुलै रोजी त्यांनी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. सोनम वांगचुक यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून देशातील प्रत्येक तरुण त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी संविधानाचा अभ्यास करा, प्रोटोकॉलनुसार…मोदींच्या फोटोवरून कृष्णराज महाडिकांनी अमित ठाकरेंना सुनावलं!
  • ऑपरेशन करण्यापूर्वी इथे डॉक्टर सर्वातआधी रुग्णांची जात विचारतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
  • 38 वर्षांपासून कोर्चात ससेहोलपट, आरोपी गेला तो आलाच नाही; पण वृद्ध पोलिसांचे प्रचंड हाल, साताऱ्याच्या खटल्याची देशात चर्चा
  • Ola ने लॉन्च केली नवीन स्कूटर, एका चार्जमध्ये धावणार 301 किमी, किंमत फक्त…
  • Eknath Shinde : हे तर मोठं दुर्दैव, बाळासाहेबांना धनुष्यबाण…सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच शिंदेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in