• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सेउटासाठी मोरोक्को आणि स्पेनमध्ये राडा! हजारो स्थलांतरित पोहत पोहोचले, 18 जणांचा मृत्यू

July 31, 2026 by admin Leave a Comment


मोरक्को आणि स्पेन यांच्यात सेउटा शहरावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. कारण मोरोक्कोतून हजारो स्थलांतरीत बेकायदेशीररित्या सेउटा शहरात दाखल झाले आहेत. बेकायदेशीर मार्गाने त्यांनी या शहरात घुसखोरी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने स्पेनकडे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून सैन्य पाठवण्याची मागणी केली आहे. पण स्पेनने आणीबाणी लागू करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सेउटा शहरातील स्पॅनिश नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. खरं तर हा वाद नेमका काय? घुसखोरी करण्याचं कारण काय? असे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. मोरक्कोच्या भूमीत वसलेल्या युरोपियन शहर सेउटाबाबत नेमकं काय प्रकरण आहे? चला सोप्या शब्दात समजून घेऊयात.

सेउटा कुठे वसलं आहे?

सेउटा हे स्पॅनिश शहर भूमध्य समुद्राजवळ वसलं असून मोरोक्कोच्या भूभागाने वेढलेलं आहे. म्हणजेच या शहाराची सीमा मोरोक्कोशी जोडलेली आहे. सेउटा शहर खूपच लहान असून या शहरात जवळपास 85 हजार लोकं राहतात. या शहरात ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू आणि इतर समुदायाचे लोक आहे. या शहरावर स्पॅनिश आणि अरबी संस्कृतीचा स्पष्ट प्रभाव दिसतो. 1415पासून या भूभागावर स्पॅनिश आणि पोर्तुगीज राजेशाहीचा ताबा होता. पण सेउटाचे स्पेनसोबत संबंध चांगले होते. त्यामुळे 1668 मध्ये पोर्तुगालने सेउटावरील स्पेनचा ताबा औपचारिकपणे मान्य केला. तेव्हापासून सेउटा स्पेनच्या अधिपत्याखाली आहे.

मोरोक्कोचा दावा काय?

सेउटा हे अफ्रिकन भूमीवर वसलेलं आहे आणि मोरोक्कोचा उत्तर किनाऱ्यावर असलेला नैसर्गिक भूभाग आहे. त्यामुळे मोरक्कोकडून सेउटाची मागणी केली जात आहे. कारण या भागावर अधिपत्य असलेला सेउटा आणि मेलिल्ला हे युरोपियन वसाहतवादाचे अवशेष मानले जात आहेत. अनेक देशांनी वसाहतवादातून स्वातंत्र्य मिळवलं आहे. मात्र अफ्रिकेच्या भूमिवर अजूनही युरोपीयन वसाहतवादाचा ताबा आहे. दुसरीकडे, स्पेनचा असा दावा आहे की सेउटा ही वसाहत नाही. तो देशाचा एक कायमस्वरूपी आणि घटनात्मक भाग आहे. स्पेन आपले हक्क सोडण्यास तयार नाही. मोरोक्कोदेखील आपला दावा सोडत नाही. त्यामुळे हा प्रश्न भविष्यात आणखी चिघळणार आहे.

मोरोक्कन लोकं मोठ्या संख्येने काम, व्यवसाय आणि कौटुंबिक कारणांसाठी या ठिकाणी सीमा ओलांडतात. शहराच्या अर्थव्यवस्थेवर आजूबाजूच्या मोरोक्कन प्रदेशाचाही प्रभाव आहे. जेव्हा सीमा बंद केली जाते किंवा नियंत्रण अधिक कडक केले जाते, तेव्हा सर्वसामान्य लोकांना सर्वाधिक फटका बसतो. छोटे व्यापारी, रोजंदारी मजूर आणि सीमापार कामगारांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्पॅनिश सरकारी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या 10 दिवसांत सुमारे 15 ते 20 हजार लोकांनी प्रवेश केला आहे. या घुसखोरीदरम्यान 15हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in