• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरून संजय राऊतांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘शिंदेंना एकच पर्याय….’

August 6, 2026 by admin Leave a Comment


सुप्रीम कोर्टात आज गुरुवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावावर सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणावर काल देखील सुनावणी पार पडली. न्यायालयात ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. काल सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल. कालच्या युक्तिवादामुळे शिंदे गटात चलबिचल सुरू आहे. त्यांच्यापुढे आता गट भाजपमध्ये विलीन करण्याचा पर्याय उरला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद दिला. संजय राऊत म्हणाले, ‘अत्यंत योग्यपद्धती आणि धारदार युक्तिवाद हा ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला. विधीमंडळातील आमदारांचा गट फुटला म्हणून मूळ पक्ष फुटल्याचे मानता येणार नाही, हे त्यांनी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाला पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी देखील घटनापीठासमोर उभा होतो. अनेक शंका न्यायालयाच्या मनात होत्या. त्याचं निरसन केले. एका चिन्हावर निवडून आलेले लोक हे कोणत्याही कायद्याचे बंधन न पाळता सत्तेत घुसू लागले, तर लोकशाही, संविधानाला अर्थ राहणार नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढे येऊन यांच्यावर बंधने घातली पाहिजे’.

‘विधीमंडळ पक्षात फूट फडली. आमिष आणि लोभापोटी फूट पडली. खरंतर मूळ पक्ष आणि धनुष्यबाण ही शिवसेनेकडे राहील, अशी भूमिका मांडण्यात आली. आमच्या वकिलांनी न्यायालयाचे समाधान करण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाला संविधानाविषयी जाणीव आहे, हे निरीक्षण करताना जाणवले. आपल्यापुढे देशातील ऐतिहासिक खटला आहे. या खटल्याच्या निर्णयामुळे देशावर दूरगामी परिणाम होणार आहे. हे सरन्यायाधीशांना ठाऊक झालं आहे. आता आम्ही निश्चिंत आहोत. कायदा आता त्याचं काम करेल. त्यांनी आमच्याशी बेईमानी केली. त्यांनी घटनेशी द्रोह केला. आम्ही कायद्याच्या माध्यमातून संपवू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘माझी आजची माहिती अशी आहे की, समोरच्या पक्षात चलबिचल सुरू झाली आहे. आता पक्षच भाजपमध्ये विलीन करण्याची चर्चा आहे. एक लहान पक्ष अलीकडे विलीन करून घेतला होता. टीएमसी प्रमाणे सुरू आहे. आता लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील. त्यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. निवडणूक आयोगाचा चुकीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्यास महाराष्ट्रातील जनता आणि देशातील लोकशाहीचा मोठा विजय होईल, असा दावा राऊत यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in