• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुप्रिया सुळे यांच्या लेकीची प्री-वेडिंग पार्टी… शाहरुख खानने असं काय केलं, सर्वत्र चर्चा… Inside video व्हायरल

June 20, 2026 by admin Leave a Comment


एकीकडे राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे… सध्या सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरू झाल्या आहे. रेवती यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावायला सुरुवात केली आहे. सध्या अभिनेता शाहरुख खान याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान सुप्रिया सुळे यांची लेख रेवती यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये दमदार डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये शाहरुख खान रेवती सुळे आणि त्यांचा होणारे पती सारंग लखानी यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. डान्स करत असताना शाहरुख खान याने रेवती सुळे आणि संजय यांना जवळ घेतलं आणि लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by shiva chiliveri (@shivachiliveri1)

 

शाहरुख खान ‘कोई मिल गया’ गाण्यावर थिरकला

एका अन्य व्हिडिओमध्ये शाहरुख खान ‘कोई मिल गया’ या गाण्यावर अतिशय उत्साहाने नाचताना दिसत आहे. त्याचा उत्साह आणि शैली पाहण्यासारखी आहे. त्याने या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ‘किंग खान’चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पार्टीमध्ये प्रसिद्ध गायक राहुल वैद्य याने देखील हजेरी लावली. त्याने अनेक गाणी गायली आणि आपल्या शानदार सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.

शाहरुख खानचा आगामी सिनेमे

शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झाल्यास, शाहरुख खान सध्या त्याच्या ‘किंग’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. या ॲक्शन-थ्रिलर सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. शाहरुख खानव्यतिरिक्त, या सिनेमा सुहाना खान, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी आणि राणी मुखर्जी यांसारखे सेलिब्रिटी दिसणार आहेत. सिनेमा 24 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सुप्रिया सुळे यांच्या  कुटुंबाबद्दल सांगायचं  झालं तर, सुप्रिया व सदानंद सुळे या दोघांना रेवती आणि विजय अशी दोन मुलं आहेत. ती शरद पवार यांची नातवंडं आहेत. सध्या रेवती सुळे यांच्याबद्दल जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता आहे.

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in