• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुपरस्टारच्या आईचं निधन, सांत्वनासाठी त्रिशासोबत पोहोचले थलपती विजय; उंचावल्या नेटकऱ्यांच्या भुवया

May 31, 2026 by admin Leave a Comment


तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजित कुमार यांची आई मोहिनी मणी यांचं निधन झालं. आईच्या निधनाचं वृत्त मिळतात अजित कुमार शनिवारी दुबईहून चेन्नईला परतले. या दु:खद घटनेवेळी चित्रपटसृष्टी आणि राजकीय वर्तुळातील अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केलं. यामध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचाही समावेश होता. सोशल मीडियावर अजित कुमार आणि थलपती विजय यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये विजय हे अजित कुमार यांची गळाभेट घेऊन त्यांचं सांत्वन करताना दिसत आहेत. मात्र यावेळी त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या अभिनेत्री त्रिशा कृष्णनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

विजय यांच्यासोबत त्रिशानेही शनिवारी अजित कुमार यांच्या घरी त्यांना भेट दिली. अजित कुमार यांच्या आई मोहिनी मणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी दोघं तिथे पोहोचले होते. सोशल मीडियावर या भेटीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अजित कुमार यांच्या घराबाहेरील एका व्हिडीओमध्ये विजय हे कडेकोट सुरक्षेत गाडीमधून उतरताना दिसून येत आहेत. गाडीतून उतरताच ते आधी अजित यांना मिठी मारतात. यावेळी त्यांच्या बाजूला काळ्या रंगाच्या सूटमध्ये त्रिशा उभी असल्याचं पहायला मिळतंय. तीदेखील नंतर अजित यांना मिठी मारते आणि त्यांचं सांत्वन करते.

विजय आणि त्रिशा यांचा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Actor Vijay Team (@theactorvijayteamoff)

विजय आणि त्रिशा हे एकाच गाडीतून आले की वेगवेगळे, हे स्पष्ट नाही. विजय यांच्यासोबत त्रिशा याठिकाणी काय करतेय, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला. तर ‘सर्वकाही ठीक होतं, पण जेव्हा बाजूला त्रिशाला पाहिलं तेव्हा आश्चर्य वाटलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. विजय आणि त्रिशा हे त्यांच्या नातेसंबंधामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे.

अजित कुमार यांच्या आई मोहिनी मणी यांच शनिवारी सकाळी चेन्नई इथल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. तीन वर्षांपूर्वी अजित कुमार यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला… पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर
  • PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
  • संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवर घडला मोठा अनर्थ; शूटिंगदरम्यान तंत्रज्ञाचा मृत्यू
  • 6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in