• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सिल्व्हर ओकला शिवसेना…, शिवसेना ठाकरे गटावर टीका करताना संजय शिरसाटांची जीभ घसरली, मोठं वक्तव्य

September 2, 2026 by admin Leave a Comment


आज शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी पार पडली, यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली. दरम्यान या सुनावणीपूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘जिथे शिंदे तिथे सौदा’ अशी नवी डिक्शनरी आता येत आहे, असा घणाघात राऊत यांनी केला होता, दरम्यान त्यानंतर आता संजय राऊत यांच्या या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर जहरी टिका केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?

आम्ही सर्व नियम पाळले आहेत, घटनेत जी तरतूद केलीये त्या सगळ्या गोष्टींचं आम्ही पालन केलं आहे.  खासदार , आमदार , नगरसेवक , जिल्हाप्रमुख यांचा सगळा डाटा आम्ही निवडणूक आयोगाला दिला आहे. कार्यकर्त्यांची नोंदणी त्यांच्याकडे नव्हती. सुप्रीम कोर्टात देखील निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्यावरुन निर्णय घेईल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे म्हणजे सौदा अशी टीका राऊत यांनी केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी वादग्रस्त टीका केली आहे.

“एकनाथ शिंदेंना सौदा म्हणता मग तुम्ही ज्यांच्या शासनावर शिवसेना झोपवली तुम्हाला वेश्या म्हाणावं का? तुम्ही सिल्व्हर ओकला शिवसेना झुकविली, तुम्हाला समान आर्थी शब्द वेश्या, अशी वादग्रस्त टिका यावेळी शिरसाट यांनी संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटावर केली आहे. दरम्यान यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांच्या या टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चालता येईना… जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
  • विनोद पाटलांनी मनोज जरांगे पाटलांना सुनावलं, म्हणाले मराठा समाजाबद्दल…
  • KBC : टाईल्स फिट करणाऱ्याने जिंकले 50 लाख, 1 कोटीचा तो प्रश्न देशात चर्चेचा विषय; 99 टक्के लोकांना उत्तर माहितीच नाही!
  • Gold Price Today: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठा चढ-उतार, अवघ्या 6 तासांत….
  • बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस… कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in