• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सियाच्या WhatsApp चॅटमध्ये नेमकं काय? ट्रेकिंगवर जाण्याचा प्लान कोणाचा होता? महत्त्वाची माहिती समोर

June 26, 2026 by admin Leave a Comment


केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्याकांडावरून अनेक दावे केले जात आहेत. केतनच्या हत्येशी संबधित आता नवा दावा समोर आला आहे. पुण्यातील लोहगडच्या किल्ल्यावर ट्रेकिंवर जाण्याचा हट्ट नेमकं कोणाचा होता, याबाबत आरोपी सिया गोयलच्या आईने धक्कादायक दावा केलाय. संपूर्ण देशात चर्चा होत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणावर आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी धक्कादायक दावा करत म्हटलं की, लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी सिया नव्हे, तर केतनने सांगितले होते. ट्रेकिंगवर जाण्याविषयीचं संभाषण आताही सियाच्या मोबाईलमध्ये आहे.

पोलिसांच्या दाव्यानुसार, 18 जून रोजी लोहगडच्या किल्यावर नियोजित हत्येचा कट रचण्यात आला होता. दुसरीकडे सियाच्या आई-वडिलांच्या म्हणण्यांनुसार , सिया आणि चेतन चौधरीच्या कथित प्रेमसंबंधाविषयी त्यांना माहिती नव्हती. तसेच सिया केतनशी लग्न होणार असल्याने आनंदी नव्हती, याबाबतही माहीत नव्हतं.

पूजा गोयल यांनी केलेल्या दाव्यानुसार, सिया 18 जून रोजी लोहगडावर जाण्याच तयार नव्हती. तिने व्हिडिओ कॉलवर होणाऱ्या सासूशी देखील संवाद साधला होता, त्यावेळी तिने ट्रेकिंगवर जाण्यास तयार नसल्याचे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरला जायचे असल्याने सिया जाण्यास नकार देत होती’. पूजा गोयल यांनी पुढे सांगितले की, ‘सियाने केतनला लोगगड किल्यावर जाण्यास नकार दिला होता. परंतु केतनच्या कुटुंबीयांनी जाण्यास विनंती केल्यानंतर सिया जाण्यास तयार झाली’.

पोलिसांच्या तपासातूनही वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीच्या आधारावर संशय व्यक्त होत आहे की, लोहगड किल्यावर जाण्याचा प्लान आधीच ठरवला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तपासात समोर आलं की, एक दिवस आधी सिया गोयल आणि चेतन चौधरीची एका कॅफेत भेट झाली होती. या दोघांच्या गुप्त भेटीत चर्चा झाली. या भेटीतच केतनच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू आहे.

पूजा गोयल यांनी कबूल केलं की, चेतन चौधरी आणि सिया एकमेकांना ओळखत होते. दोघांची ओळख एका क्रिकेट मॅचदरम्यान झाली होती. दोघे मित्र होते, एवढंच आम्हाला माहिती होतं. दोघांमध्ये प्रेमंसंबध होते, याविषयी आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. त्यांच्या प्रेमसंबंधाविषयी माहिती असती, तर आम्ही केतन आणि सियाच्या लग्नाचा विचार केला नसता. साखरपुडा झाल्यानंतरही सियाच्या चेहऱ्यावर कधी नाराजी दिसून आली नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात पहिला राजीनामा
  • 15 लाखांचे पॅकेज असणाऱ्यांनी कोणती कार खरेदी करावी? ChatGPT ने या कारना रँकिंग पाहा कोणत्या ?
  • केतनचे टक्कल होते म्हणूनच.. सियाचे धक्कादायक पाऊल, थेट लोहगडावरून 400 फूट..
  • Azaan Ban : लोकांना असं वाटू नये की ते इस्लामाबादमध्ये…अजानवरुन युरोपमधला एक देश महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत
  • वटपौर्णिमेला स्वानंदी देणार प्रेमाची कबुली? ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये रंजक ट्विस्ट, तेजश्री प्रधानच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in