• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सिद्धार्थ मल्होत्रासोबत Kissing Scene, प्रसिद्ध अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लाईट्स बंद झाल्या, कट बोलल्या नंतरही…

June 21, 2026 by admin Leave a Comment


Kissing Scene : बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांमध्ये किसिंग सीन तर असतोच. अशात तुम्ही देखील कित्येकदा असं ऐकलं असेल की, किसिंग सीन दरम्यान, सेलिब्रिटी स्वतःचं नियंत्रण गमावतात आणि कट म्हटल्यानंतर देखील किस करतात. असाच एक दावा एंटरटेनमेंट जर्नलिस्ट सिमी चंदोक यांनी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्याबद्दल केला आहे. सिमी यांनी अशा काही घटना सांगितल्या, जेव्हा दिग्दर्शकाने कट म्हणाल्यानंतर देखील जॅकलिन सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेता टायगर श्रॉफ याला किस करत राहिली. सिमी यांनी जॅकलिन हिच्याबद्दल असे दोन किस्से सांगितले, जेथे ती अभिनेत्यांनी किस करतच राहिली.

नुकताच झालेल्या एका मुलखतीत सिमी यांना विचारण्यात आलं की, ‘किसिंग सीन दरम्यान अभिनेते भान हरपतात, असं अनेकदा समोर आलं आहे. पण अभिनेत्रींसोबत देखील असं होतं का?’ यावर सिमी यांनी दावा केला की, दिग्दर्शकाने कट बोलून देखील जॅकलिन आणि सिद्धार्थ एकमेकांना स्मूच करत राहिले.

सिमी म्हणाल्या, ‘जॅकलिन आणि सिद्धार्थ ‘जेंटलमॅन’ सिनेमासाठी शुटिंग करत होते. जॅकलिन आणि सिद्धार्थ यांचा किसिंग सीन संपला, लाईट्स बंद झाल्या, कॅमेरा देखील ऑफ झाला, ऍक्शन बंद झाली… कट देखील बोलून झालं आणि तरी देखील दोघे एकमेकांना स्मूच करत राहिले.’, फक्त सिद्धार्थच नाही तर, सिमी यांनी जॅकलिन आणि टायगर यांच्या किसिंग सीनबद्दल देखील सांगितलं.

सिमी म्हणाल्या, ‘जॅकलिन आणि टायगर यांनी ‘फ्लाइंग जट्ट’ सिनेमात एकत्र काम केलं. त्या सिनेमात देखील दोघांचा किसिंग सीन आहे. त्या किसिंग दरम्यान देखील दोघांचं देखील नियंत्रण सुटलं… जॅकलिन, टायगर याला किस करत राहिली… कट कट कट म्हटल्यानंतर देखील दोघेस थांबले नाहीत… जॅकलिन एका हॅलीकॉप्टरसाठी सुकेश याला किस करु शकते तर, टायगर तर किती हँडसम आहे..’ असा खुलासा सिमी चंदोक यांनी केला आहे.

दोन्ही सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सिद्धार्थ आणि जॅकलिन यांचा सिनेमा 2017 मध्ये प्रदर्शित झालेला. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फ्लॉप ठरला. जॅकलिन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘फ्लाइंग जट्ट’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा 2016 मध्ये प्रदर्शित झालेला. हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?
  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in