
सध्या सर्वत्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन चर्चेत आहे. त्याने बालपणीची मैत्रिण साराशी लग्न केले आहे. लग्नातील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर स्पेन्सर जॉनसनबद्दल सर्वजण जाणून घेत आहे.
स्पेन्सर जॉन्सन हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आहे. तो डावखुरा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये देखील कामगिरी केली आहे. तसेच तो बिग बॅश लीग स्पर्धेत ब्रिस्बेन हीटकडून मैदानात उतरला होता.
स्पेन्सर जॉन्सन हा आयपीएल सामान्यांमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळला होताय त्यापूर्वी तो महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. त्याची लोकप्रियता कायम आहे.
इटलीमधील एका ऐतिहासिक हवेलीमध्ये स्पेन्सर जॉन्सन आणि सारा यांचा विवाह पार पडला. अतिशय खासगी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
स्पेन्सर जॉन्सनची पत्नी सारा ही इंटिरियर डिझायनर आहे. ती एका मोठ्या कंपनीशी जोडलेली आहे. सारा आणि स्पेन्सर हे बालपणापासून एकमेकांना ओळखतात. त्यांनी दोन वर्षांपूर्वी साखरपुडा केला होता. आता त्यांनी लग्न केल्याचे समोर आले आहे.




Leave a Reply