• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सापाचा दंश की कोळ्याचा? ते 2 छिद्र दिसताच… कळेल तुम्हाला सत्य?

April 23, 2026 by admin Leave a Comment


Snake or Spider Bite : उन्हाळ्यात साप अथवा इतर कीडे हल्ला करण्याचा धोका वाढतो. तापमान वाढल्याने साप हे थंड ठिकाणी अथवा मनुष्यवस्तीजवळ वावरतात. अथवा शेतात पाण्याच्या आजूबाजूला राहतात. जेव्हा मनुष्याचा या भागात वावर वाढतो, तेव्हा ते थेट हल्ला करतात. पण कोळी अथवा सापाने दंश केला तर ते कसे ओळखायचे हे तुम्हाला माहिती आहे का? अनेकदा त्या चावल्याच्या निशाणीवरून आणि खुणेवरून सापाने दंश केला की कोळी चावला हे काही समोर येत नाही. पण ते जाणून घेणे गरजेचे आहे कारण की सापाच्या विषाचा परिणाम पुढील काही मिनिटात लागलीच दिसतो. त्यामुळे इलाजात उशीर करणे योग्य ठरत नाही. तेव्हा निशाण्यावरून कोणता प्राणी चावला हे समजून घेणे आवश्यक आहे.

साप चावण्याचे निशाण

सापाने दंश केल्यावर त्या भागातील त्वचेवर दोन खोलवर खड्डे होतात. हे छिद्र सापाच्या चावण्याने होतात. साप विषारी असल्यास जीवाला मोठा धोका होऊ शकतो. या छिद्राजवळील त्वचा सुजते. त्यातून खून येतो. हा भाग सुजतो. त्वचेचा रंगही बदलतो. जर साप हा विषारी असेल तर लागलीच उलटी होते. चक्कर येते. श्वास घ्यायलाही मोठी अडचण होते. डोकेदुखी सुरू होते. अस्वस्थ वाटते.

कोळी चावल्यास काय होते?

कोळी चावल्यास दोन छिद्र दिसतात. पण ते अधिक खोल नसतात. सापाने चावल्यावर जितके खोल छिद्र उमटतात. तितके हे खोल नसतात. कोळी जिथं चावला, तिथली त्वचा लाल होते. तिथं सूज येते आणि खाज सुटते. काही वेळा असं काही होत नाही. कोळी चावल्यावर त्याचे मोठे दुष्परिणाम दिसत नाही. त्वचेला सूज येऊन तिथं छोटी जखम होऊ शकते.

दोघांमध्ये अंतर काय?

साप चावल्यानंतर त्वचेवर खोल आणि स्पष्ट दोन छिद्र दिसतात. त्याठिकाणची त्वचा लाल होते. मोठी सूज येते. तर कोळी चावल्यानंतर त्याठिकाणची छोटी छिद्र स्पष्ट दिसत नाहीत. ती अस्पष्ट दिसतात. तो भाग थोडा सुजतो आणि लाल होतो. साप चावल्यानंतर शरीरावर थेट परिणाम दिसतो. साप विषारी असेल तर मग चक्कर येणे, उल्टी होणे असे प्रकार होतात. अस्वस्थपणा जाणवतो. साप चावल्यास लागलीच इलाज करणे अत्यावश्यक आहे. साप चावल्याचे निशाण, खून अधिक खोल असेल तर कोणताही विलंब न करता थेट रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. साप चावल्यावर धाऊ नये, अथवा जास्त चालू नये. त्यामुळे विष रक्तात वेगाने पसरू शकते. शांत राहावे. तज्ज्ञाकडे जावे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनसेचं पुन्हा खळ्ळखट्ट्याक! अंगावर आला तर… अमित ठाकरे यांची ठोकाठोकीची भाषा; अमराठी रिक्षाचालकांना सज्जड दम
  • हॉरर चित्रपटांचे शौकीन आहात? तर 2 तास 10 मिनिटांची ही कथा उडवेल तुमची झोप; यूट्यूबवर उपलब्ध
  • सकाळी केलेले ‘हे’ छोटे बदल… आयुष्यभर देतील मोठे परिणाम!
  • MI vs CSK : चेन्नईकडून मोठा गेम, मुंबईच्या माजी खेळाडूला आयुष म्हात्रेच्या जागी संधी, कोण आहे तो?
  • MI vs CSK Toss : मुंबईने वानखेडेत टॉस जिंकला, रोहित-धोनी खेळणार? पाहा प्लेइंग 11

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in