
पनवेलमधील कामोठे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. घरी आल्यावर मुलीने आपल्या आजीला पोटात दुखत असल्याचे सांगत चालकाबाबत माहिती दिली. या गंभीर प्रकारानंतर चिमुकलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ कामोठे पोलिसांशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित स्कूल व्हॅन चालकाला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी मुलीचा वैद्यकीय तपासणी अहवाल आणि सविस्तर जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ६५(२) सह पोस्को ऍक्ट ५एम/६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्या मागील गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत अधिक तपास सुरू आहे. अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना अधिकृत स्कूल बसमध्येच पाठवावे आणि बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची खात्री करावी, असे आवाहन ज्योती देशमुख यांनी केले आहे.
Leave a Reply