• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमान खान नंतर आमिर खान कायद्याच्या कचाट्यात, 18 सप्टेंबर रोजी नेमकं काय होणार? जाणून घ्या नक्की झालंय तरी काय?

August 8, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खान याच्यानंतर कोर्टाने आमिर खान याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण. आजच्या दिवसांत आपण प्रत्येक जण घर बसल्या वस्तू मागवत असतो… पण अनेकदा अनुभव अत्यंत वाईट येतो. असंच काही राजस्थान येथे राहणाऱ्या कोटा शहरातील एका व्यक्तीसोबत घडलं आहे. एका ग्राहकाने ऑनलाईन काही सामान मागवलं होतं. एका नामांकित प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना ग्राहकाला अस्सल आणि टिकाऊ वस्तू मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पार्सल हाती आल्यावर समोर आलेलं पार्सल पाहून ग्राहक देखील थक्क झाला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, केवळ परिस्थिती स्वीकारण्याऐवजी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय ग्राहकानं घेतला.

हे प्रकरण आता फक्त दोन लोकांमध्ये राहिलेलं नाही, फार मोठं झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीने या संपूर्ण फसवणुकीबाबत जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. एका नामांकित ब्रँडच्या नावाखाली त्यांना बनावट वस्तू विकल्या गेल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. हा केवळ खराब उत्पादनांचा विषय नव्हता, तर त्यात ग्राहकांच्या विश्वासाचा भंग झाल्याचा मुद्दाही अंतर्भूत होता. आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे; प्राथमिक युक्तिवाद आणि पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर, आयोगाने कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पुढे नेली असून आमिर खान यांना नोटीस बजावली आहे.

स्नॅपडील आणि आमिर खान याच्या अडचणीत वाढ…

घडलेल्या प्रकरणानंतर ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म स्नॅपडीलवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. याप्रकरणी आमिर खान याला देखील नोटीस जारी करण्यात आली आहे. न्यायालयाने आमीर खान याला 18 सप्टेंबर रोजी स्वतः उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. हा वाद ‘स्नॅपडील’वरून विकल्या गेलेल्या ‘वुडलँड’ ब्रँडच्या बेल्ट्स आणि पाकिटांशी संबंधित आहे; ग्राहकाने या वस्तूंची तपासणी केली असता त्या पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर, न्याय मिळवण्यासाठी त्या ग्राहकाने न्यायालयात धाव घेतली.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, या केसमध्ये स्नॅपडील कंपनीचे को – फाउंडर कुणाल बहल आणि रोहित बंसल यांना देखील मुख्य आरोपी म्हणून सामिल करण्यात आलं आहे. तक्रारदाराने अर्जात स्पष्टपणे नमूद केलं की, आमीर खानलाही या प्रकरणात प्रतिवादी म्हणून समाविष्ट केलं जावं. ग्राहकाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, जेव्हा एखादा प्रसिद्ध कलाकार एखाद्या उत्पादनाची जाहिरात करतो, तेव्हा लोक त्यावर आंधळा विश्वास ठेवतात; त्यामुळे, जर ते उत्पादन बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले, तर जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यालाही पूर्णपणे जबाबदार धरलं पाहिजे. त्यानंतर, न्यायालयाने आमीर खानला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे,



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in