• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वात मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांच्या एका खेळीन आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य धोक्यात? मोठा गेम होणार?

June 30, 2026 by admin Leave a Comment


ठाकरे गटाचे सहा खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर अजून थांबलेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक जबर धक्का देऊन धोबीपछाड केलं आहे. शिंदेंनी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनाच फोडले आहे. सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्जही भरला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. सहा खासदार फुटण्यापेक्षाही सचिन अहिर यांनी शिंदे गटात जाणं ठाकरेंसाठी धक्कादायक असल्याचं मानलं जात आहे. कारण अहिर यांच्यामुळे आता आदित्य ठाकरेंचं राजकीय भविष्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन अहिर यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीतून झाली. सचिन अहिर हे राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्षही होते. राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्रीही होते. वरळी हा त्यांचा बालेकिल्ला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडून आले होते. 1999 ते 2019 पर्यंत सचिन अहिर राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीतून ते शिवसेनेत आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांना पाहिलं जात होतं.

आदित्यसाठी वरळी सोडली…

शिवसेनेत येण्यापूर्वी ठाकरे गटाचे सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांना वरळीतून पराभूत केलं होतं. त्यानंतर सचिन अहिर ठाकरे गटात आले. पण आदित्य ठाकरे यांनी वरळीतून उभं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा सचिन अहिर यांनी वरळीवर दावा केला नाही. त्यांनी वरळीत आदित्य ठाकरेंसाठी काम केलं. तसेच सुनील शिंदे यांनीही आदित्य ठाकरेंसाठी वरळीची सीट सोडली होती. या दोन्ही नेत्यांमुळे आदित्य ठाकरे निवडून आले होते. मात्र, आता सचिन अहिर फुटल्याने आदित्य ठाकरे यांचं राजकीय भविष्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरळी हा सचिन अहिर यांचा बालेकिल्ला आहे. मच्छिमार वर्ग ही अहिर यांची मुख्य व्होटबँक आहे. आता अहिर यांच्या माध्यमातून शिंदे हा मतदारसंघ अधिक मजबूत करण्यावर भर देण्याची शक्यता आहे. तसेच पुढच्या काळात आदित्य यांच्यासमोर अहिर यांच्या रुपाने तगडं आव्हान वरळीतून निर्माण होण्याची शक्यताही आहे. शिंदे यांच्या या एका खेळीमुळे आदित्य ठाकरे यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in