
समद्रात मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. उसळत्या समुद्राच्या लाटा, खराब हवामान आणि एक बोट बुडत होती. या बोटीत सहा लोक अडकले होते. आपला जीव वाचवण्यासाठी धडपड सुरु होती. रात्रीच्या वेळ होती आणि हे सहा लोक आपल्या मृत्यूशी झुंज देत होते. अतिशय कठीण काळ असल्याने सुटका होईल की त्यांचा जीव वाचेल की नाही असा प्रश्न होता पण या रात्रीच्या भयाण शांतेत भारतीय तटरक्षक दलांनी पुन्हा एकदा चमत्कार करुन दाखवला. भारतीय तटरक्षक दलांनी पुन्हा एकदा उसळत्या समुद्राच्या लाटा, खराब हवामान आणि बुडणाऱ्या बोटीच्या संकटात जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या सहा मच्छिमारांच्या मदतीला धावून आले आहे. तटरक्षक दलाने मंगळूरूजवळ रात्रीच्या वेळी एक अत्यंत आव्हानात्मक आणि धाडसी मोहीम राबवून सर्व सहा मच्छिमारांची सुखरूप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘मंजू माथा’ नावाची एक मासेमारी बोट कर्नाटकातील सुरतकलपासून सुमारे 33 सागरी मैल अंतरावर खोल समुद्रात होती. अचानक, खराब हवामान आणि उंच लाटांचा तडाखा बसल्याने बोटीच्या तळाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीमुळे बोटीत वेगाने पाणी भरू लागले, ज्यामुळे ती बुडण्याचा आणि मच्छिमारांच्या जीवाला धोका निर्माण झाला. या संकटाच्या क्षणी, मच्छिमारांनी तात्काळ VHF-RT द्वारे आपत्कालीन कॉल केला. भारतीय तटरक्षक दलाच्या ‘आयसीजीएस सचेत’ या जहाजाने तो संकटकालीन कॉल शोधून काढला आणि क्षणभरही विलंब न लावता घटनास्थळाकडे कूच केले. समुद्राची परिस्थिती अत्यंत खडतर होती, परंतु तटरक्षक दलाच्या जवानांनी हार मानली नाही.
VIDEO | Kerala: Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) rescues six persons after fishing boat sinks off Mangaluru.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/xn8HLI2HEu
— Press Trust of India (@PTI_News) June 30, 2026
खराब हवामान आणि उंच लाटा असूनही, तटरक्षक दलांनी सावधगिरीने काम केले. मच्छिमारांपर्यंत पोहोचण्यासाठी रिमोटने चालणाऱ्या लाईफबॉयचा वापर करण्यात आला. एकामागून एक, सर्व सहा लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. त्यानंतर तटरक्षक दलाने सर्व वाचवलेल्या मच्छिमारांना न्यू मंगळुरू बंदरात आणले, जिथे त्यांना पुढील देखभालीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
भारतीय तटरक्षक दलाने म्हटले आहे की, “हे अभियान समुद्रातील मानवी जीवनाच्या संरक्षणाप्रती असलेली त्यांची दृढ वचनबद्धता दर्शवते. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित कर्मचारी आणि तत्पर प्रतिसादासह, तटरक्षक दल कोणत्याही सागरी आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. एका अधिकृत निवेदनात, तटरक्षक दलाने म्हटले आहे की, ‘वयम रक्षमः’ (आम्ही रक्षण करतो) या आपल्या ब्रीदवाक्यानुसार, ते देशाच्या सागरी क्षेत्रावर सतत लक्ष ठेवून आहे आणि समुद्रात संकटात सापडलेल्यांना वेळेवर मदत पोहोचवणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे”.
Leave a Reply