• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अरुण गवळीचा भाचा, कामगार नेते ते माजी मंत्री… कोण आहेत सचिन अहिर?

June 30, 2026 by admin Leave a Comment


कुख्यात गुंड अरुण गवळीचा भाचा, कामगार नेते, माजी मंत्री सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने 8 दिवसांत उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. अहिर यांनी शिंदे गटाकडून विधीमंडळात उपसभापतीसाठी अर्ज भरला. त्यानंतर सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेना प्रवास केलाय. आता ते लवकरच उपसभापतीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. एकेकाळी वरळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे सचिन अहिर कोण आहेत, हे जाणून घेऊयात.

सचिन अहिर हे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मानले जायचे. 21 मार्च 1972 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नी संकल्प प्रतिष्ठान चालवतात. सध्या ते विधानपरिषद सदस्य आहेत. याआधी त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. पहिल्यांदा ते 1999 साली आमदार झाले. पुढे 2009 साली राज्यमंत्री झाले. राष्ट्रवादीतून संयुक्त शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना शिवसेना उपनेते पद देण्यात आलं होतं.

सचिन अहिर यांनी 1993 साली राष्ट्रीय मिल कामगार संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केलं होतं. सचिव पद सांभाळल्यानंतर पुढे त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यांनी माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा यूनियन संघटनेचंही नेतृत्व केलं आहे. त्यांनी कामगारांच्या पगारवाढीसाठी अनेक आंदोलने केली आहेत. पुढे 1999 ते 2019 सालापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले आहेत. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघ सोडला. आदित्य उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडला. 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिलिंद देवरा, संदीप देशपांडे मैदानात उतरल्यानंतरही आदित्य ठाकरे जिंकले होते. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी दोन वेळा विजय प्राप्त केला आहे.

सचिन अहिर यांचं अरुण गवळीशी जवळचं नातं आहे. अरुण गवळी हा सचिन अहिर यांचा नात्याने मामा लागतो. अहिर हे अरुण गवळीच्या बहिणीचा मुलगा आहे. अरुण गवळीच्या पत्नीचं नाव आशा गवळी आहे. लग्नाआधी आशा यांचं नाव जुबैदा मुजावर होते. गवळीशी लग्न केल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. तर सचिन हे गवळीची बहीण आशालता यांचे पुत्र आहेत. आशालता यांचा विवाह हा मोहन गंगाराम बनिया उर्फ अहिर यांच्याशी झाला. ते एअर इंडियामध्ये कामाला होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in