• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

समीर रिझवी याच्यावर लव्ह जिहादचे आरोप, गर्लफ्रेंडला मुस्लीम रितीरिवाज पाळण्याची शिकवण, नेमके सत्य काय ?

May 2, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणारा उत्तर प्रदेशातील क्रिकेटर समीर रिझवी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. समीर रिझवी याच्यावर लव्ह जिहादचे आरोप लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून समीर रिझवी यांचे नाव स्पोर्ट्स अँकर येशा सागर हीच्याशी जोडले जात आहे. अनेक बातम्यात दावा केला जात आहे की समीर रिझवी आणि येशा सागर एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. समीर रिझवी मुस्लीम आहे तर येशा सागर हिंदू आहे.

सोशल मीडियावर समीर रिझवी संदर्भात अनेक चर्चा सुरु आहेत. समीर रिझवी याने येशा सागर हिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्याने येशा हिला बिकनी घालण्यास मनाई केल्याचे देखील म्हटले जात आहे. तसेच त्याने सोशल मीडियातील तिचे बिकनीतील फोटोही डिलिट करण्यास सांगितल्याचे म्हटले जात आहे. समीर रिझवी येशा सागर हिला कुराणचे आयते वाचण्यास सांगत असल्याचे म्हटले जात आहे. समीर रिझवी याने येशा सागर हिला अन्य क्रिकेटरना शेक हँड करण्यासही मनाई केल्याचेही म्हटले जात आहे.

येशा सागर हीची पोस्ट

सोशल मीडियावर समीर रिझवी याच्या संदर्भात अनेक दावे केले जात आहे. या दाव्यात सत्यता किती आहे हे जाणने महत्वाचे आहे. येशा सागर हीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की,’ इंटरनेटवर तुम्ही जे काही पाहाता आणि वाचता, त्यावर विश्वास ठेवू नये.’या पोस्टमध्ये तिने सर्व दावे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

येथे पाहा पोस्ट –

मैंने टाइमलाइन पर देखी कि समीर रिजवी ने अपनी गर्लफ्रेंड येशा सागर को इंस्टाग्राम से अपनी सभी बिकिनी तस्वीरें डिलीट करने को कहा है, और उसने ऐसा कर भी दिया है।

उन्होंने येशा को आयतें याद करने और क्रिकेटरों से हाथ न मिलाने, सिर्फ नमस्ते करने की सलाह भी दी है।

नारीवादी लड़कियां तब… pic.twitter.com/531aahkPpO

— ममता ट्राबल (@Mamtasulaniya) May 1, 2026

नात्या संदर्भात आळीमिळी गुपचिळी

आता पर्यंत समीर रिझवी वा येशा सागर यांनी त्यांच्या नात्या संदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. केवळ सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघे युपी टी-२० लीग दरम्यान जवळ आल्याचे म्हटले जात आहे. येथून दोघांचे प्रेम सुरु झाल्याचा दावा केला जात आहे. येशा सागर युपी टी-२० लीगमध्ये अँकर आहे, समीर रिझवी हा कानपूर टीमचा कर्णधार आहे.

येथे पोस्ट पाहा –

मॉडल-एक्ट्रेस और स्पोर्ट्स प्रजेन्टर येशा सागर को मेरठ के क्रिकेटर समीर रिजवी की लेडी-लव बताया जा रहा है. कल से सोशल मीडिया पर तमाम चर्चाऐं है.

ऐसा भी कहा गया कि दोनों रिलेशनशिप में है और समीर के कहे मुताबिक येशा सागर ने अपनी हिंदू परंपराऐं बदलना शुरू कर दी है. समीर पर आरोप… pic.twitter.com/TIaqi4RX8E

— Narendra Pratap (@hindipatrakar) May 2, 2026

या सर्वांची सुरुवात अशी झाली

विशेष म्हणजे या सर्वांची सुरुवात एका क्रिडा पत्रकाराच्या पोस्टने झाली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘उत्तर प्रदेशातील एक मुस्लीम क्रिकेटर आणि एक हिंदू स्पोर्ट्स अँकर प्रेमात आहेत.’  सोशल मीडियावर या आरोपानंतर येशा सागर हीने समीर रिझवी याला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs MI: डेब्यूसाठी 8 सामने केली प्रतीक्षा, संधी मिळताच 10 चेंडूत केला सूर्यकुमारचा गेम ओव्हर
  • खोबरेल तेलाचे दोन थेंब ठरतील लाभदायक, पूर्णपणे नाहीसे होतील पूरळ
  • फक्त महिलांच्या आरोग्यासाठीच नाही तर, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ‘हे’ फळ
  • त्वचेला थंडावा आणि आराम देण्यासाठी चेहऱ्याला लावा दही काकडीचा फेस पॅक, जाणून घ्या त्याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत
  • मोठी बातमी! शहर हादरलं, न्यायाधीशाने आपलं आयुष्य संपवलं, मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in