• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त महिलांच्या आरोग्यासाठीच नाही तर, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ‘हे’ फळ

May 2, 2026 by admin Leave a Comment


लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना आवडणारं एक फळ म्हणजे केळी… केळीची भाजी देखील करतात. तर केळीच्या पानांना हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. पण केळीच्या फळांबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? केळीच्या झाडाला मिळणारं फूल आरोग्याच्या दृष्टीने एक अद्भुत खजिना आहे. केळीच्या फुलामध्ये फायबर, प्रथिने, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे, तसेच जीवनसत्त्वे ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त, त्यात शरीरासाठी आवश्यक असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स देखील भरपूर प्रमाणात असतात. एवढंच नाही तर, विशेषतः मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांसाठी हे एक वरदान आहे.

तर जाणून घ्या आहारात केळीच्या फुलाचा समावेश करण्याचे अद्भुत फायदे आजच्या काळात अनेक महिला हार्मोनल असंतुलनाने त्रस्त आहेत. केळीचे फूल पीसीओडी, अति रक्तस्राव आणि मासिक पाळीतील तीव्र वेदनांपासून आराम देते. ते नैसर्गिकरित्या हार्मोन्सचे नियमन करण्यासाठी आश्चर्यकारक काम करते. तसेच, त्यातील उच्च लोहाच्या प्रमाणामुळे ते ॲनिमियाला प्रतिबंध करते आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवते. त्यामुळे, ते शरीराला पुरेशी ऊर्जा प्रदान करते आणि थकवा कमी करते.

केळीच्या फुलांमध्ये असलेले फायबर केवळ पचनसंस्था स्वच्छ करत नाही, तर बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांनाही प्रतिबंध करते. त्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ते रक्तदाब (BP) नियंत्रणात ठेवून हृदयविकारांचा धोका कमी करते. मधुमेही व्यक्ती रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी त्याचे नियमित सेवन करू शकतात.

केळीच्या फुलातील दाहशामक गुणधर्म केवळ शरीरातील सूज कमी करत नाहीत, तर जीवाणू आणि विषाणूंपासूनही संरक्षण करतात. त्यात असलेले मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी मेंदूचे कार्य सुधारतात. ते तणाव कमी करण्यास आणि मानसिक शांती वाढविण्यात मदत करते. म्हणूनच, केवळ चवीसाठीच नव्हे, तर सर्वांगीण आरोग्यासाठी आठवड्यातून किमान एकदा आहारात केळीच्या फुलाचा समावेश करणे खूप चांगले आहे. पण आहात कोणतेही बदल करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या…



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! मतदानात हेराफेरी… आता 21 मे रोजी पुन्हा निवडणूक, बंगालमधील या जागेबाबत मोठी घोषणा
  • शेअर्सना पडले मागे, Gold ETF गुंतवणुकीने यावर्षी मारली बाजी
  • CSK vs MI : मुंबईच्या फक्त 159 धावा, पलटण चेन्नई सुपर किंग्सला रोखणार?
  • GK : माशांना कान असतात का? 99 टक्के लोकांना माहितीच नाही
  • घराच्या या दिशेला कपाट ठेवल्याने पैसा होतो आकर्षित, जाणून घ्या वास्तू नियम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in