• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सतत चक्कर येतेय, ‘या’ लक्षनांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष, जाणून घ्या नेमकं कारण काय?

June 27, 2026 by admin Leave a Comment


सध्या पाहिलं तर, वातावरणात सतत बदल होत आहेत, ज्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. अनेक जण तर कामाच्या गडबडीत सर्वकाही विसरून जातात. आरोग्याकडे ते कधीच लक्ष देत नाही. हे पुढे जाऊन धोक्याचं ठरू शकचं… अनेक लोक सामान्य थकवा, हवामानातील बदल किंवा तणावामुळे येणाऱ्या वारंवार चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही समस्या वाटते तितकी सोपी नाही. कधीकधी हे शरीरातील आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. पण चक्कर येण्याचं एकमेव कारण जीवनसत्त्वांची कमतरता नाही. कमी रक्तदाब, ॲनिमिया, शरीरातील पाण्याची कमतरता आणि इतर आरोग्य समस्यांमुळेही चक्कर येऊ शकते, त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या आणि ती म्हणजे, कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे चक्कर येऊ शकते आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चक्कर येऊ शकते?

व्हिटॅमिन बी12, फोलेट (व्हिटॅमिन बी9) आणि व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळे देखील चक्कर येऊ शकते. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी12 आणि फोलेट आवश्यक असतात. यांच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो, ज्यामुळे मेंदू आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने चक्कर येणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि तोल जाऊ शकतो. यामुळे काही लोकांना चक्कर किंवा अस्थिरता जाणवू शकते.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका…

जर तुम्हाला चक्कर येण्यासोबतच खालील लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. श्वास लागणे, अंधुक दृष्टी, हात आणि पायांना मुंग्या येणे, चालण्यात अडचण, बेशुद्ध होणे, तीव्र डोकेदुखी किंवा छातीत दुखणे… यांसारख्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आहारात बदल करा.

जर तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल, तर स्वतःहून औषधोपचार करू नका किंवा व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक रक्त तपासण्या करून घ्या. संतुलित आहार, भरपूर पाणी आणि चांगली झोप आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. जर चक्कर येण्यासोबतच छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, बोलण्यास अडचण येणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसत असतील, तर तात्काळ वैद्यकीय मदत घेणे अत्यावश्यक आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता शुल्क पुन्हा भरावे लागणार अन् नोंदणी पुन्हा करावी लागणार? TETचा पेपर फुटताच सरकारचा मोठा निर्णय
  • वरमाळा गळ्यात पडल्यानंतर काही मिनिटांत लग्न मोडलं; नव्या नवरीने सांगितलं धक्कादायक कारण
  • गाणं पाहिजे तर असं, एकदा ऐकलं तरी दिवसभर गुणगुणतात लोक, लपून लपून ऐकतात लोक
  • Vat Purnima 2026 : कधी आहे वटपौर्णिमा 28 की 29 जून? जाणून घ्या पूजेचा शूभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी
  • गुंतवणूकदार मालामाल! 88 रुपयांचा शेअर थेट 200 पार; या’ ज्वेलरी शेअरने दाखवली कमाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in